शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुळा-पवना नदीच्या संगमावरील पाण्याची पातळी वाढली

By admin | Updated: August 4, 2016 01:15 IST

गेले दोन दिवस शहर परिसरामध्ये पडत असलेल्या पावसामुळे दापोडी येथील मुळा-पवना नदीच्या संगमावरील पाण्याची पातळी वाढलेली आहे.

पिंपरी : गेले दोन दिवस शहर परिसरामध्ये पडत असलेल्या पावसामुळे दापोडी येथील मुळा-पवना नदीच्या संगमावरील पाण्याची पातळी वाढलेली आहे. गेले अनेक दिवस नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी दिवसभरात ५६ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर कायम असल्याने पवना धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. धरणाचा पाणीसाठा ७५ टक्के झाला आहे. फुटांत तो २००३ इतका आहे. ३ आॅगस्टअखेर १४२९ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी या कालावधीत ११६५ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत या वर्षी २६४ मिमी जास्त पाऊस झाला आहे. मागील वर्षी धरणात ६५ टक्के इतका पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत तो १० टक्के जास्त आहे. पाऊस सुरू राहिला, तर अवघ्या ४ ते ५ दिवसांत पवना धरण फुल्ल होऊ शकते. ८० टक्क्यांपेक्षा जादा पाणी साठा झाल्यानंतर धरणातून पाणी विसर्ग सुरू केला जाऊ शकतो. यामुळे पावसाचा अंदाज घेऊन पवना नदी काठाजवळ राहणाऱ्या नागरिकांनी सावधान राहणे गरजेचे आहे, असे पवना शाखा अधिकारी मनोहर खाडे यांनी सांगितले. शहरवासीयांना अजूनही आणखी काही दिवस एक दिवस आड पाणी मिळणार आहे. त्यामुळे आणखी मोठा पाऊस पडेल आणि शहरातील पाणीटंचाई दूर होईल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. पाणीटंचाईचा आणखी काही दिवस सामना करावा लागणार आहे.