शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर ग्रीड’ करेल राज्याचा कायापालट - लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:29 IST

‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्राची स्वत:ची पाणीपुरवठा योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. पाणीपुरवठा योजना राबविताना एक स्रोत संपला

‘वॉटर ग्रीड’च्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्राची स्वत:ची पाणीपुरवठा योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. पाणीपुरवठा योजना राबविताना एक स्रोत संपला की दुसरा स्रोत अशी शोधाशोध करण्यापेक्षा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाण्याची शाश्वत रचना निर्माण करण्यात येत आहे. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून दुष्काळी भागातही पाणी पोहोचविणे शक्य होणार असून त्यामुळे महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.वॉटर समिट-२०१७च्या माध्यमातून ‘लोकमत समूहा’ने पाणीप्रश्नावर व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे सांगून बबनराव लोणीकर म्हणाले की, दोन वर्षांच्या दुष्काळात सहा हजार टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ राज्यावर आली. त्यानंतर जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यभरातील ११ हजार गावांतील नद्यांचे खोलीकरण, धरणे आणि तळ्यातील गाळ काढणे, नवीन पाण्याचे साठे तयार करणे आदी कामे हाती घेण्यात आली.आपल्या घराला लागणाऱ्या पाण्याचा विचार प्रत्येक व्यक्ती करते. तसाच विचार राज्याला लागणाऱ्या पाण्याबद्दल व्हायला हवा. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नाचा विचार करून योजना हाती घेतल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ११ हजार गावांत सरकारच्या वतीने पाण्याची कामे झाली. लोकसहभागातून निधी उभारण्यात आला. लोकसहभागातून राबविण्यात आलेली ही क्रांतिकारक योजना असल्याचे लोणीकर म्हणाले.