शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी एक्स्प्रेस’ मिरजेतून आज लातूरच्या दिशेने?

By admin | Updated: April 11, 2016 03:16 IST

लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वे टँकर रविवारी मिरजेत पोहोचले. रेल्वेस्थानकातील यंत्रणेमार्फत हे टँकर भरण्यास सुरुवात झाली आहे. पुरेसे टँकर भरल्यास सोमवारीच लातूरला

मिरज : लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वे टँकर रविवारी मिरजेत पोहोचले. रेल्वेस्थानकातील यंत्रणेमार्फत हे टँकर भरण्यास सुरुवात झाली आहे. पुरेसे टँकर भरल्यास सोमवारीच लातूरला ही पाणी एक्स्प्रेस रवाना करण्यात येईल. राजस्थानच्या कोटा येथून ५० टँकर रविवारी सकाळी मिरजेत आले. टँकर भरण्यासाठी रेल्वे पाणीपुरवठा केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यासाठी चार दिवस लागणार असल्याने रेल्वेस्थानकातील पाणी भरण्याच्या यंत्रणेद्वारे दुपारी दहा टँकर भरण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, पाणी भरण्याची गती अत्यंत कमी असल्याने रात्रीपर्यंत दहा टँकर भरले नव्हते. किमान दहा टँकरमध्ये पाणी भरून सोमवारी ते लातूरला पाठविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारपर्यंत रेल्वे यार्डापर्यंतच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर लातूरला सुरळीत पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी मिरजेत आलेले टँकर स्थानकाबाहेर सायडिंगला लावण्यात आले. मात्र, रेल्वेमंत्री तसेच अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर प्लॅटफॉर्मवरून पाणी भरण्यास परवानगी मिळाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी शनिवारी पाणी भरण्यास नकार दिला होता. (प्रतिनिधी)