शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

थेंब थेंब पाणी वाचविणारे जलदूत

By admin | Updated: June 1, 2016 04:45 IST

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन तो वाचविण्यासाठी राज्यभरात जलमित्र चळवळ उभी राहिली आहे. पाण्याचा अपव्यय टाळून थेंब न् थेंब पाण्याची बचत करण्यासाठी राज्यातील

मुंबई : पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन तो वाचविण्यासाठी राज्यभरात जलमित्र चळवळ उभी राहिली आहे. पाण्याचा अपव्यय टाळून थेंब न् थेंब पाण्याची बचत करण्यासाठी राज्यातील जलदूतांनी पुढाकार घेतला आहे.ठाण्यातील ८१ वर्षीय आबीद सुरती यांनी २००७ पासून ड्रॉप डेड फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची मोहीम व जनजागृती सुरू केली आणि त्यांच्या या कार्याची दखल विविध स्तरावर मोठ्या प्रमाणात घेतली जाऊ लागली. ड्रॉप डेड फाउंडेशनच्या माध्यमातून फेब्रुवारी २००७ पासून आबीद यांनी स्वत: मीरा रोड परिसरातील घराघरांत जाऊन गळके नळ विनामूल्य दुरुस्त करून देण्याची मोहीम हाती घेतली. पहिल्याच वर्षात आबीद यांनी मीरा रोडमधील १ हजार ६६६ घरांना भेटी दिल्या. त्यात ४१४ गळके नळ त्यांनी विनामूल्य दुरुस्त केले. आजही प्रत्येक रविवारी ते सोबत प्लम्बर घेऊन घरोघरी जातात. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी हजारो नळांची दुरुस्ती करून लाखो लिटर पाणी वाचवले आहे. किंगखान शाहरूख खान याने देखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. जलबचतीसाठी व्यापक लोकसहभाग व जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासाठी एक मिनिटाचा लघुपट बनवण्याची स्पर्धा घेतली होती.आॅस्ट्रेलियात वास्तव्य असलेल्या परंतु सध्या दीड-दोन महिन्यांसाठी जळगावात परतलेल्या सुरेश पाटील यांनी त्यांच्या घराच्या आवारातील बंद असलेल्या कूपनलिकेवर रेनवॉटर हार्वेस्टिंग केले आहे. त्यांच्या घराच्या २५०० चौ.फूट छताचे पाणी या पावसाळ्यात त्या बंद असलेल्या कूपनलिकेत सोडले जाणार आहे. ठाण्यातील जलमित्र नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिकेच्या निधीची वाट न बघता बायर इंडियाच्या मदतीने आपल्या प्रभागातील चार विहिरींची साफसफाई करून त्यातील पाणी इतर वापरासाठी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे येथील सुमारे २० हजार घरांना पाणीकपातीच्या काळातही या विहिरींतील पाण्याचा वापर होऊ लागला आहे. (प्रतिनिधी)हायलाईटस्च्सातारा : जिल्ह्यातील खटाव आणि माण या कायम दुष्काळी तालुक्यांमध्ये शासन तसेच खासगी संस्थांकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पाणी भरण्यासाठी येथे मोठा पाईप असायचा, परंतु तो काढून नळाच्या तोट्या बसविण्यात आल्यामुळे पाणी गळती थांबली.च्मलकापूर येथे अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानात पाणी मारण्याऐवजी ‘ब्लोअर’ने धूळ साफ करण्यास प्राधान्य दिले आहे.च्खटाव तालुक्यातील खातगुण ग्रामपंचायतीच्या वतीने शोषखड्डे तयार करण्यात आले असून सांडपाणी येथे सोडण्यात येते.च्ठाणे : येथील निसर्गप्रेमी संघटनांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या जंगलातील गाळ काढला.च्सोलापूर : बिगर बझार या शॉपिंग मॉलमध्ये ‘लोकमत बालविकास’ मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बालमित्रांनी पाणीबचतीचा संदेश दिला.