शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पाणीसंकट दूर होईपर्यंत पाणीप्रश्नावर काम करणार - आमिर

By admin | Updated: May 5, 2016 18:53 IST

राज्यात पाण्याची समस्या फार मोठी आहे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून या प्रश्नावर मात करता येऊ शकते. म्हणून आम्ही पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे.

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. ५ : राज्यात पाण्याची समस्या फार मोठी आहे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून या प्रश्नावर मात करता येऊ शकते. म्हणून आम्ही पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील वरूड, कोरेगाव (सातारा), अंबेजोगाई (बीड) या तीन तालुक्यांतील गावांमध्ये स्पर्धा सुरू केली असून स्पर्धेत सहभागी गावांसाठी ह्यपाणी फाऊंडेशनच्यावतीने एक कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्य टंचाईमुक्त होईपर्यंत पाणीप्रश्नावर सतत काम करीत राहीन, अशी ग्वाही पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमिर खान यांनी दिली.

वरूड तालुक्यातील वाठोडा या गावी गुरूवारी पहाटे ६.३० वाजता आमिर खान यांचे मराठी सिने कलावंतांसह आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी काटोलचे आमदार आशिष देशमुख, आमदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, तहसीलदार भुसारी, पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, वसुधा बोंडे, सरपंच मनोज बाडे, उपसरपंच सरोज उपासे, पंचायत समितीचे माजी सभापती नीलेश मगर्दे, अभिनेत्री रिमा लागू, मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर, सुनील बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमिर खान यांनी वाठोडा गावच्या पाझर तलावात श्रमदान करून तलावातील गाळ काढला. यावेळी वाठोडा गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी मानवी साखळी करून दोन तास श्रमदान केले. आमिर खान पुढे म्हणाले, यावर्षी ३ तालुक्यांत तर पुढील वर्षी ३० तालुक्यांत आणि त्यापुढील वर्षी ३०० तालुक्यांत ही स्पर्धा घेण्यात येईल. राज्य पूर्णपणे टंचाईमुक्त होईपर्यंत आम्ही ही स्पर्धा घेतच राहू. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावात जलसंवर्धनाचे उपक्रम राबविले जाणार असल्याने प्रत्येकच गाव विजेता ठरेल, असेही आमिर खान यावेळी म्हणाले.सत्यजित भटकळ यांनी 'वॉटर कप' स्पर्धेसाठी वाठोडा ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले व स्पर्धेची माहिती दिली. शास्त्रीयदृष्ट्या पाणी अडविणे, जिरविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक गावातील ५ लोकांना प्रशिक्षण दिले आहे. वरूड तालुक्यात या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनातील अधिकारी नियमितपणे श्रमदान करतात. ही चळवळ निश्चिपणे पाणीप्रश्न संपवेल. यावेळी अभिनेत्री रिमा लागू, सई ताम्हणकर, सुनील बर्वे, आ. अनिल बोंडे यांची देखील भाषणे झालीत. जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले, वाठोडा तालुक्यात ५६ हजार एकर जमीन मशागतीखाली आहे. त्यातील १० हजार एकर जमीन सिंचनाखाली आहे. पुढील तीन वर्षांत या भागात ठिबक करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.