शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपात कायम राहणार

By admin | Updated: August 4, 2016 01:13 IST

पाणीसाठा केवळ १९१ दिवस पुरणार असून, सध्या तरी नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

पिंपरी : पवना धरण आजअखेर ७५ टक्के भरले. आजचा पाणीसाठा केवळ १९१ दिवस पुरणार असून, सध्या तरी नियमित पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आणखी काही दिवस पाणीकपात कायम राहणार आहे.पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पवना धरणाचा पाणीसाठा ७५ टक्के झाला आहे. मावळ परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. धरणातील साठा वाढत आहे. पाणीसाठा समाधानकारक असल्याने महापालिकेतील सदस्यांनी पाणीकपात मागे घेऊन नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली होती. पाणीकपात मागे घेणार का, या विषयी आयुक्तांना विचारले असता, आणखी काही दिवस पाणीकपात करणे शक्य नाही, पाणीसाठा वाढल्यास जलसंपदा विभागाशी चर्चा करून कपात मागे घेण्याविषयी बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे आयुक्तांनी सांगितले. आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘‘पवना धरणाचा एकूण साठा २७२.११ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामध्ये २४०.९७ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी ३ आॅगस्टला पाणीसाठा ६५.३५ टक्के एवढा होता. सध्या २५ टक्के कपात पाणीपुरवठ्यात करण्यात आली असून, आजच्या धरणसाठ्यानुसार हा पाणीपुरवठा २६० दिवस म्हणजे २० एप्रिल २०१७ रोजी पर्यंत पुरेल इतका आहे. १५ टक्के पाणीकपात केल्यास २२९ दिवस म्हणजे २० मार्च २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करता येईल. पाणीकपात १० टक्के केल्यास २१२ दिवस म्हणजे ३ मार्च २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करता येईल आणि कपात रद्द केली, तर १९१ दिवस म्हणजे १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होईल. लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.’’ (प्रतिनिधी)