शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

उद्योगनगरीत लवकरच पाणीकपात?

By admin | Updated: March 1, 2017 00:24 IST

पवना धरणात फेब्रुवारी अखेर ५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

पिंपरी : उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाणी कपातीसंदर्भात आढावा घेण्यात येतो. पवना धरणात फेब्रुवारी अखेर ५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या मार्च महिन्यांत धरणातील साठा आणि पुरवठा यांचा आढावा घेण्यासाठी पाटबंधारे विभाग, महापालिकेचे अधिकारी यांची बैठक होईल. त्यानंतर शहरात पाणी कपातीविषयीचा निर्णय होणार आहे.पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडून रावेत येथील जलउपसा केंद्रातून हे पाणी उचलले जाते. ते पाणी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागातील नागरिकांना पुरविले जाते. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यातच पवना धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध पाणीयोजना, तळेगाव, उर्से, वडगाव मावळ या भागातील पाणीयोजनांना वर्षभर पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे पाटबंधारे विभागाने सूचित केले होते. पवना धरणातून वीजनिर्मिती आणि पिंपरी-चिंचवडला पिण्यासाठी दिवसाला ४५० एमएलडी पाणी सोडले जाते. पवना धरणाची एकूण क्षमता १० टीएमसी आहे. या धरणात आजअखेर ५७ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यानच्या कालखंडात धरण १०० टक्के भरल्याने दिवसाआड पाण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर दिवसातून दोनदाऐवजी एकवेळ पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले होते. त्यामुळे सध्या शहरात एकवेळ पाणीपुरवठा आहे. आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात होणार की नाही, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.‘‘पाणी साठा कमी झाल्यास जलसंपदा विभागाच्या वतीने महापालिकेला सूचना केली जाते. पाणीपुरवठ्यासंदर्भात पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला जाणार आहे. महिनाभरात या संदर्भात आढावा घेण्यात येणार असून, त्यानंतर कपात करायची की नाही, यावर निर्णय होईल, असे पुरवठा विभागप्रमुख रवींद्र दुधेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>गटनेत्यांशी होणार चर्चामहापालिकेच्या वतीने केलेल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासमवेत आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली जाईल. धरणातील पाणीसाठा आणि पावसाचा अंदाज घेऊन, साठा किती दिवस पुरेल याचा आढावा घेऊन त्यानंतर महापौर, उपमहापौर, विविध पक्षांचे गटनेते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.