शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

शिवकालीन पाणी साठवणुकीतून ‘जलसंधारण’

By admin | Updated: October 1, 2014 01:30 IST

राज्यात विविध प्रकारच्या ८८११ जलसंधारणाची बांधकामे करण्यात आलीत.

संतोष वानखडे/वाशिम राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा मुख्य घटक असलेल्या शिवकालीन पाणी साठवण उपयोजनेतून फेब्रुवारी २0१४ पर्यंत राज्यात विविध प्रकारच्या ८८११ जलसंधारणाची बांधकामे करण्यात आली आहेत. जलपातळीतील घट उंचाविण्याबरोबरच जलपातळी समान ठेवणे, या दृष्टिकोनातून शासनाने विविध उपक्रम व योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेचाच एक भाग असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत विविध उपयोजना राबविल्या जात आहेत. साधारणत: पावसाळा सुरू होण्यापूर्वी पारंपारिक व अपारंपारिक उपाययोजनांद्वारे पाण्याचे संधारण करणे, पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, छतावरील पाण्याची साठवणूक, पावसाचे पाणी साठवण्यासाठी डोंगराळ भागात तलाव बांधणे आदी कामे हाती घेतली जातात. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा एक मुख्य घटक असलेल्या शिवकालीन पाणी साठवण उपयोजनेतून राज्यातील ग्रामीण भागात पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी फेब्रुवारी २0१४ पर्यंत ८८११ बांधकामे करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक तीन हजार ७३ बांधकामे औरंगाबाद विभागात, त्याखालोखाल नागपूर विभागात १८८३, अमरावती विभागात १७२0, कोकण ९६५, पूणे ९१३ आणि सर्वात कमी २५७ बांधकामे नाशिक विभागात करण्यात आल्याची नोंद राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या दफ्तरी आहे. फेब्रुवारी २0१४ पर्यंत राज्यातील १२ हजार १0४ वस्त्यांची निवड विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या उपाययोजनांसाठी करण्यात आली होती. या वस्त्यांमध्ये ३१ हजार ६१0 उपाययोजना निश्‍चित केल्या होत्या. त्यापैकी १0 हजार ४१0 वस्त्यांमधील २८ हजार १२ उपाययोजना पूर्णत्वाकडे गेल्या असून त्यावर ४२१ कोटी २६ लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.