शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिकाऱ्यांचे ठाण्यात पाणीबचतीचे धडे

By admin | Updated: May 21, 2016 03:45 IST

ठाण्यात सध्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत.

अजित मांडके,

ठाणे- ठाण्यात सध्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. त्यामुळे ठाण्यात आठवड्यातून दोन दिवस आणि कळवा, मुंब्रा, दिव्यात तीन दिवसांचे पाण्याचे शटडाऊन घेतले जात आहे. महापालिकेने ठाणेकरांना पाणीबचतीचे आवाहनदेखील केले आहे. हा संदेश देतानाच त्यांनी स्वत:पासूनही पाणीबचतीस सुरुवात केली आहे. एखाद्या अधिकाऱ्याकडे ठाणेकर नागरिक भेटण्यास गेल्यास त्याला विचारल्याशिवाय पाणी दिले जात नाही. तसेच ते देताना अर्धा ग्लासच दिले जात आहे. शिवाय, ज्याज्या ठिकाणी नळांद्वारे पाणीगळती सुरू होती, त्या ठिकाणीच ती बंद करण्याचे कामही सुरू झाले आहे. ठाणे शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे शहराच्या लोकसंख्येच्या मानाने सध्या ते मुबलक असले तरीदेखील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उपलब्ध असलेला पाणीसाठा पुरवण्यासाठी महापालिकेने पाणीकपात सुरू केली आहे. तसेच हॉटेल, उद्योग, मॉल आदी ठिकाणी वापरणाऱ्या पाण्यावर अंकुश ठेवण्यासाठी या सर्वांना पाणीबचतीचे आवाहन केले आहे. परंतु, ठाणेकरांना पाणीबचतीची सवय व्हावी, या उद्देशाने पालिकेनेच या मोहिमेची सुरुवात आपल्यापासून केली आहे. महापालिकेच्या माहिती जनसंपर्क विभागात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा विचारूनच पाणी दिले जात असून तेही अर्धा ग्लासच दिले जात आहे. पाण्याची बचत करण्याचे आवाहन ठाणेकरांना करण्याबरोबरच त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच केली असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी लोकमतला दिली. नळातून वाहत जाणाऱ्या पाण्यावरदेखील अंकुश बसवण्यासाठी गळक्या नळांची दुरुस्ती करण्याचे कामही केल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या घरच्यांनादेखील जेवढे पाणी आवश्यक असेल, तेवढेच वापरण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक विभागांनादेखील आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाणीबचत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, प्रत्येक विभागात आता अर्धा ग्लासच पाणी दिले जात आहे. यातूनच पालिकेने जलमित्र होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तसेच लोकमतने सुरू केलेल्या जलमित्र या मोहिमेचेही कौतुक केले आहे.