शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर शहरावर पाणीसंकट; तीन दिवसांआड पाणी

By admin | Updated: June 30, 2016 01:40 IST

शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणी तळाला गेल्याने शिरूरकरांवर पाणीसंकट कोसळले आहे.

शिरूर : शहराला पाणीपुुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणी तळाला गेल्याने शिरूरकरांवर पाणीसंकट कोसळले आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे शहराला उद्यापासून (दि. ३०) तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेला घ्यावा लागला आहे.शहराला सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मार्च महिन्यात बंधाऱ्यात पाणीसाठा मर्यादित झाल्याने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. यानंतर नगर परिषदेने बंधाऱ्याच्या वरील भागातील इतर बंधाऱ्यातील पाणी खाली आणण्यासाठी १० ते १५ दिवस प्रयत्न केले. हे पाणी बंधाऱ्यात पोहोचण्यापूर्वी आहे तो पाणीसाठा कमी होत गेल्याने ३ एप्रिलपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. १७ एप्रिलला वरील बंधाऱ्यातील पाणी या बंधाऱ्यात आले. मात्र, हा साठाही मर्यादित असल्याने नगर परिषदेने शहराला दोन दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू ठेवला.यादरम्यान सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कुकडी प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या मागणीनुसार ५ मे रोजी कालव्याद्वारे सोडलेले पाणी बंधाऱ्यात पोहोचले. यातून बंधारा अर्धाच भरला; मात्र यानंतर शहराला पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. या बंधाऱ्यातील पाणी शेतीसाठी उपसले गेल्याने हा साठाही कमी होऊ लागल्याने १६ जूनपासून पुन्हा २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आताची परिस्थिती याहून गंभीर झाल्याने नगरपरिषदेला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पाणीटंचाईच्या या परिस्थितीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच पाणी वाया जाऊ नये यासाठी नळाला तोट्या बसवून घ्याव्यात, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.पाऊस पडल्याशिवाय बंधाऱ्यात पाणीसाठा उपलब्ध होणार नसल्याने शहरावर पाणीसंकट कोसळले आहे. शहरात गेल्या तीन दिवसांत पाऊस झाला नसून, धरणक्षेत्रातही पाऊस नाही. अशात पाऊस न झाल्यास शहराला मोठ्या पाणीसंकटाचा सामना करावा लागेल.