शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या उल्हास नदीत आज येणार पाणी

By admin | Updated: June 11, 2016 03:50 IST

उल्हास नदीतील पाणीसाठा प्रचंड घटल्याने आणि अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने गेल्या आठवड्यापासून अनेक महापालिकांत पुन्हा पाणीबाणी निर्माण झाली

सुरेश लोखंडे,

ठाणे- उल्हास नदीतील पाणीसाठा प्रचंड घटल्याने आणि अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने गेल्या आठवड्यापासून अनेक महापालिकांत पुन्हा पाणीबाणी निर्माण झाली आहे. आधीच तीन ते चार दिवस कपात असतानाही उरलेल्या दिवशी पाणीपुरवठा घटल्याने नागरिकांत तीव्र संताप आहे. त्याची दखल घेत आंध्र धरणातून शुक्रवारी संध्याकाळी जादा पाणी सोडण्यात आले. हे पाणी शनिवारी संध्याकाळपर्यंत शहाडला येणार असून कोरड्या पडलेल्या उल्हास नदीची पाणीपातळी वाढण्याची चिन्हे आहेत. किमान उपसण्याइतका हा साठा वाढल्यास पाणीपुरवठ्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागेल. नदीची जलपातळी घटल्याने मोहने, जांभूळ व टेमघर येथून पाणीपुरवठा होणाऱ्या शहरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. पाऊस पडण्याचे लक्षण दिसत नसल्यामुळे या धरणातून सोडण्यात येणारे ७०० ते ८०० एमएलडी पाणी आणखी काही दिवस पुरवावे म्हणून केवळ ५०० एमएलडीवर आणले. त्याचा फटका पाणीपुरवठ्याला बसला. त्यामुळे अनेक विभागांत गोंधळ उडाला. ओरड सुरू झाली. त्याची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने आंध्र धरणाच्या व्यवस्थापनाला पाणी सोडण्याची विनंती केल्याचे कार्यकारी अभियंता सुभाष वाघमारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठाही कमी झाला आहे. धरणात पाणी आहे, पण ते पसरलेल्या स्वरूपात आहे. पाणी सोडणाऱ्या दरवाजांजवळ त्याची पातळी कमी आहे. >अद्याप पावसाचे लक्षण नाहीमागील वर्षी आजच्या दिवशी म्हणजे १० जूनला ढगांच्या गडगडाटात आणि विजेच्या कडकडाटासह ठाणे जिल्ह्यात ८५ मिमी पाऊस पडला होता. मात्र, यंदा १० तारीख उजाडल्यावरही पावसाचे लक्षण दिसत नसल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरणातील पाणी दाबाने येत नसल्यामुळे शहरांना कमी पाणीपुरवठा होतो आहे. अशी स्थिती असली तरी बारवी व आंध्रा धरणात तीन आठवडे पुरेल एवढा पाणीसाठा आहे. आणखी काही दिवसांत पाऊस न आल्यास शेवटच्या या टप्प्यातील काही दिवस पाण्याची समस्या अधिक तीव्र होणार आहे.