शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अमृततुल्य हॉटेलमध्ये ग्लासऐवजी पाण्याच्या बाटल्या

By admin | Updated: May 16, 2016 01:09 IST

दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता प्रत्येकजण आपापल्या परीने पाणी कसे वाचवता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहे

पुणे : राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता प्रत्येकजण आपापल्या परीने पाणी कसे वाचवता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहे. हॉटेल, उसाची गुऱ्हाळे, चहाची दुकाने, रस्त्यावरील छोटी-मोठी खाद्य पदार्थांच्या दुकानांमध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पुण्याचे वैशिष्ट्य असलेले अमृततुल्य हॉटेलही पाणीबचतीच्या या मोहिमेत सहभागी झाले असून, ते वेगवेगळे उपाययोजना करून पाण्याची बचत करीत आहेत़ शहरातील कर्वे रस्ता, सदाशिव पेठ, नारायण पेठ येथील अमृततुल्य हॉटेलची लोकमत प्रतिनिधींनी पाहणी केली़ त्यात पाणी बचतीसाठीही हॉटेल अनेक नावीन्यपूर्ण उपाय करीत असल्याचे दिसून आले़ अमृततुल्य हॉटेल हे पुण्याचे एक वैशिष्ट्य आहे़ पंचतारांकित हॉटेलमध्ये नियमित जाणाऱ्या अनेकांना आपल्या कार्यालयातील कामाची सुरुवात अमृततुल्य हॉटेलमधील चहा पिऊन केल्याशिवाय चैन पडत नाही़ पूर्वी या हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी ग्राहकांना ग्लास व तांब्यांचा वापर केला जात होता. त्यामुळे ग्राहकांनी पाणी पिण्यास मागितले, तर त्यांना ग्लास भरून दिला जायचा. त्यातून ग्राहक थोडे पाणी प्यायचे आणि अर्धे पाणी टाकून द्यायचे. ही परिस्थिती लक्षात घेता आणि शहरातील पाण्याची अडचण समजून घेऊन अमृततुल्य चहाच्या प्रत्येक हॉटेलमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाण्याच्या बाटल्या ग्राहकांना पिण्यासाठी ठेवलेल्या आहेत.।श्री नंदूक्षणी निवास अमृततुल्य हॉटेलमधील अश्विन त्रिवेदी म्हणाले की, अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. आधी पाण्याची समस्या एवढी भेडसावत नव्हती़ त्यामुळे काही उपाययोजना करण्याची गरज नव्हती; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. >पाण्याचा दुहेरी वापर नळाला पाणी असूनही पाणी वाया जाऊ नये म्हणून दोन वेगवेगळ्या भांड्यात पाण्याचा साठा करून काचेचे ग्लास स्वच्छ केले जातात. आणि उरलेले पाणी फरशी साफ करण्यासाठी वापरले जाते. >प्लॅस्टिकच्या ग्लासचा वापर पाण्याची नासाडी होऊ नये व ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या दिवशी पिण्याचे पाणी आले नाही, तर प्लॉस्टिकच्या ग्लासचा वापर केला जातो. या प्लॉस्टिक ग्लासमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. >या पाहणी दरम्यान हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला असता, माणकेश्वर अमृततुल्य हॉटेलचे शेखर चव्हाण म्हणाले की, पाणी म्हणजे जीवन. हे फक्त पुस्तकातच वापरले जाते; पण त्याचा प्रत्यक्ष जीवनातही अवलंब केला पाहिजे. याच उद्देशाने आम्ही गेल्या ४ वर्षांपासून पाण्याच्या ग्लासऐवजी बाटलीचा वापर करतो. त्यामुळे पाण्याची नासाडी होत नाही. >दुष्काळाची परिस्थिती पाहता शहरात एकदिवसाआड पाणी सोडले जात आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पाणी जपून कसे वापरता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. - एम. पी. त्रिवेदी, नागनाथ भुवन अमृततुल्य, नारायण पेठ