शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूउपसा करणाऱ्या चार बोटींना जलसमाधी

By admin | Updated: April 5, 2017 01:12 IST

कानगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या चार बोटी जिलेटीनच्या साह्याने उडवून या बोटींना जलसमाधी देण्यात आली.

पाटस : कानगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या चार बोटी जिलेटीनच्या साह्याने उडवून या बोटींना जलसमाधी देण्यात आली. तहसीलदार विवेक साळुंखे यांनी केलेल्या कारवाईबाबत वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. कानगावला भीमा नदीपात्रात बेकायदेशीर वाळूउपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार विवेक साळुंखे यांच्यासह महसुली पथक सकाळी ८ च्या सुमारास कानगावच्या भीमा नदीपात्रालगत गेले, त्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा सुरू होता.या कारवाईत तहसीलदार विवेक साळुंखे, धनाजी पाटील, भगवान येडे, सुनील जाधव, विजय खारतुडे, संजय स्वामी, प्रकाश कांबळे, एस. एन. गायकवाड, अभिमन्यू जाधव, मालाजी जाधव, संतोष शितोळे यांच्यासह महसूल खात्याचे कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)>कडक कारवाई केली जाईल गेल्या वर्षापासुन बेकायदेशीर वाळु वाहतुक करणाऱ्या वाळु माफियांच्या विरोधात कडक कारवाई सुरु केलेली आहे. अशीच कारवाई भविष्यातही केली जाईल. जो कोन्ही शासकीय नियम तोडुन वाळु वाहतुक करेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल - विवेक साळुंखे (तहसीलदार, दौंड)>वाळूचा ट्रक अंगावर घातलाकासुर्डी (ता. दौंड) येथील टोलनाक्यावर बेकायदेशीर वाळू थोपविण्यासाठी महसुल पथक तैनात करण्यात आले होते. या वेळी कासुर्डी टोलनाक्याच्या पुढे बेकायदेशीर वाळूवाहतूक करणारा ट्रक (एमएच १२ जेएफ ८७४२) दिसला. या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने एका तलाठ्याच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करून सरकारी कामकाजात आडथळा आणल्या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून ट्रक ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार विवेक साळुंखे यांनी दिली.