शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सागरी किनाऱ्यांवर ९१ चेक पोस्टवरून वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:17 IST

२६/११च्या हल्ल्यातील कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब व साथीदारांची सागरी मार्गे मुंबईत एन्ट्री

राजेश निस्ताने मुंबई : २६/११च्या हल्ल्यातील कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब व साथीदारांची सागरी मार्गे मुंबईत एन्ट्री झाल्यानंतर पोलिसांनी गेल्या काही वर्षांपासून सागरी किनाºयांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. सुरक्षेसाठी दरवर्षी नवनवीन उपाययोजना व आणखी दक्ष राहण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे.सागरी किनाºयांच्या सुरक्षेत कोणतीही कसर राहू नये म्हणून केंद्र शासन व तटरक्षक दलाकडून सागरी पोलीस ठाण्यांना वेळोवेळी मदत केली जाते. पोलिसांना बोटीद्वारे सागरी गस्त घालता यावी म्हणून केंद्र शासनाकडून २८ व राज्याकडून २९ अशा ५७ नव्या वेगवान बोटी पुरविल्या जाणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना याचे वाटप केले गेले आहे.जुन्या १० बोटींसह ६७ बोटींनी तसेच सागरी किनाºयालगतच्या परिसरात जीप, मोटारसायकल व पायी गस्त केली जात आहे. जुन्या २५ सागरी पोलीस ठाण्यांमध्ये १२ नवीन ठाण्यांची भर घातली गेली. आता ४४ सागरी पोलीस ठाणी कार्यरत आहेत. जुने ५९ व नव्या ३२ अशा ९१ सागरी चेक पोस्ट कार्यरत आहेत. सुरक्षेची साधनसामग्री व उपकरणे ठेवण्यासाठी पोलिसांकरिता आॅपरेशनल रूमचे बांधकाम केले गेले आहे.१७६९ पोलिसांची वानवासागरी पोलीस ठाण्यांसाठी ४३६८ पोलीस - अधिकाºयांची पदे मंजूर असली तरी सध्या २५९९ एवढेच कार्यरत आहेत. १७६९ मनुष्यबळाची अजूनही वानवा आहे.साडेसातशे तांत्रिक कर्मचाºयांची कमतरतावेगवान बोटी चालविण्यासाठी तांत्रिक पोलीस कर्मचाºयांची १००४ पदे निर्माण करण्यात आली असली तरी त्यापैकी केवळ ३४९ कर्मचारी कार्यरत आहेत.मच्छीमारांच्या १४ हजार बोटीसागरी किनाºयावर मच्छीमारांच्या १४ हजार २२२ बोटींची नोंद करण्यात आली आहे. ओळख होण्यासाठी जिल्हानिहाय सांकेतिक रंग निश्चित करण्यात आले असून, १३ हजार ९६६ या बोटींचे कलर कोडिंग करण्यात आले आहे. याशिवाय १ लाख ८० हजार ८५६ मच्छीमार बांधवांना बायोमेट्रिक कार्डचे वाटप करण्यात आले.