शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अचानक श्रीमंत होणाऱ्या उमेदवारांवर वॉच

By admin | Updated: January 21, 2017 01:22 IST

नगरसेवक झाला अन् पाच वर्षांत संपत्ती दहा पटीने वाढल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.

पुणे : नगरसेवक झाला अन् पाच वर्षांत संपत्ती दहा पटीने वाढल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. अशा अचानक श्रीमंत होणाऱ्या उमेदवारांना चाप लावण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे वॉच ठेवला जाणार आहे. उमेदवार अर्ज दाखल करताना मागील लढविलेल्या निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा हिशोब देखील यावेळी उमेदवारांना द्यावा लागणार आहे. तसेच यावेळी प्रथमच पॅन कार्डची माहिती देणे देखील बंधनकारक आहे.राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत विविध प्रकारची शपथ पत्र दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये वय, शिक्षण, व्यवसाय, अपत्यांची संख्या आदी माहिती सोबतच दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीकरित शिक्षा होऊ शकेल अशी प्रलंबित प्रकरणांची माहिती, गुन्ह्याची माहिती उमेदवाराचा पॅन क्रमांक, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील, एकूण मालमत्ता यांचा तपशील द्यावा लागणार आहे.या पवित्र्यामुळे प्रथमच मागील निवडणुकीच्या वेळी उमेदवारांची संपत्ती किती होती व त्यानंतर संपत्तीत किती वाढ झाली हे मतदारांना कळणार आहे. तसेच एकूण वार्षिक उत्पन्न काय व त्याचे स्त्रोत देखील जाहीर करावे लागणार आहे.