शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांवर वॉच

By admin | Updated: July 2, 2016 02:59 IST

पालिकेने २०१२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग’ प्रणाली अमलात आणली होती.

भार्इंदर : पालिकेने २०१२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग’ प्रणाली अमलात आणली होती. परंतु, त्यात काही फारसे नसल्याचे कारण देत तत्कालीन आयुक्तांनी ती बंद केली होती. ती पुन्हा सुरू करण्यासाठी स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. या प्रणालीला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शहरातील गटारे, नाले, रस्ते, पूल ही कामे होतात. ही कामे वेळेत व योग्यरीत्या पूर्ण होतात की नाही, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे अन्य कामांवर परिणाम होत असल्याने ती वेळेत पूर्ण होत नाहीत. कामांचा वेळेत निपटारा व सुरू असलेल्या कामांवर एकाच वेळी नियंत्रण ठेवण्यासाठी २०१२ मध्ये तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग प्रणाली सुरू केली होती. यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणचे दृश्य थेट ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीआरएस) प्रणालीद्वारे मोबाइल अथवा टॅबवर पाहता येत होते. यामुळे विभागप्रमुख व आयुक्तांचे त्यावर थेट नियंत्रण असायचे. कामात काही गैर होत असल्यास जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यास वरिष्ठांकडून त्या ठिकाणी भेट दिली जायची. झाडाझडती घेऊन त्यावर कारवाई केली जात होती. यात शिस्तीचा पायंडा पडल्याने कामांचा निपटारा वेळेत व योग्यरीत्या होऊ लागला होता. विक्रमकुमार यांच्या बदलीनंतर ही प्रणाली त्यानंतरच्या तत्कालीन आयुक्तांना रुचली नाही. परिणामी, ती बंद झाल्याने कामांमध्ये अनियमितता व गैरप्रकाराचे पेव फुटले. त्याला आळा घालण्यासाठी ही प्रणाली पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाने नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला होता. त्याला समितीने मान्यता दिल्याने ही प्रणाली लवकरच सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)>अन्य विभागही प्रणालीत आणाप्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी ‘व्हीएमएस माय सिटी’ हे अ‍ॅप सुरू केले आहे. त्यावरून, नागरिकांना विविध प्रकारच्या तक्रारी समस्यांच्या ठिकाणांहूनच प्रशासनाला मोबाइलद्वारे पाठवता येणार आहे. यानंतर, पुन्हा मोबाइल प्रोजेक्ट ट्रॅकिंग प्रणाली सुरू केली आहे. ती केवळ सार्वजनिक बांधकाम विभागापुरती मर्यादित आहे. या प्रणालीच्या कक्षेत इतरही विभाग समाविष्ट करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.