शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेचा कहर, आणखी तीन बळी

By admin | Updated: May 20, 2016 01:48 IST

अकोला जिल्ह्यात तापमानाचा कहर; उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली.

अकोला: जिल्ह्यात तापमानाचा कहर सुरूच असून, गुरुवारी उष्माघातामुळे आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. बोरगाव मंजू येथील गजानन मोहे (६0) हे बुधवारी नेहमीप्रमाणे गावातील शेळ्य़ा घेऊन जंगलात घेऊन गेले होते. प्रखर उन्हापासून बचाव करण्यासाठी ते झाडाखाली विसावले; मात्र अस्वस्थ वाटू लागल्यानंतर ते कोसळले. ही घटना माहीत पडताच नातेवाइकांनी त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात हलविले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गजानन मोहे यांच्यावरच कुटुंबाचा भार होता. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे मोहे कुटंब उघड्यावर पडले असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मोहे कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गांधीग्राम येथील अरुण भाऊराव मांजरे ( ६0) या वृद्ध मनोरुग्णाचा उन्हामुळे मृत्यू झाला. मांजरे हे गावात नेहमी भटकत होते. १८ मे रोजी तीव्र उन्हामध्ये अनेकांना मांजरे फिरताना आळळले. उन्ह जिव्हारी लागल्याने ते मरण पावले. तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे उष्माघाताने शेतमजूर मृत्यूमुखी पडला. शांताराम शंकर खोडे (४१) हे शेतमजुरीकरिता मिळेल तेथे होते. १९ मे रोजी भुईमुगाचे कुटार आणण्याकरिता शेतात गेले. घरी परत आल्यानंतर त्यांना अचानक भोवळ आली व ते खाली कोसळले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक शांताराम खोडे अविवाहित होते. दरम्यान, बुधवारी भांबेरी येथील गणेश गुलाबराव खंडागळे (५0) आणि चिखलगाव येथील एका ६५ वर्षे अनोळखी इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाला.