शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘विमानतळाजवळील कचरा नियमित उचलणार’

By admin | Updated: January 15, 2015 05:29 IST

विमानतळाजवळील कचरा नियमित उचलला जाईल, अशी हमी महानगरपालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून दिली

मुंबई : विमानतळाजवळील कचरा नियमित उचलला जाईल, अशी हमी महानगरपालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून दिली. विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने तेथे पक्ष्यांचा वावर अधिक असतो. पक्ष्यांमुळे विमान अपघाताचा धोका असतो. त्यामुळे येथे साफसफाई ठेवावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते दत्ता माने यांनी दाखल केली आहे. याचे प्रत्युत्तर सादर करताना पालिकेने ही हमी दिली. विमानतळाच्या १० किमीच्या परिसरात २,६९४ कचरापेट्या आहेत. तेथील कचरा नियमित उचलला जातो. याव्यतिरिक्त कचरापेट्यांवर मोठी प्लास्टिकची बॅग ठेवण्याचा विचार आहे. याने तेथे पक्षी येणार नाहीत. येथील खुले नाले नियमित साफ केले जाणार आहेत. येथील सर्व मटण व चिकन शॉप तसेच हॉटेल्स व बारमालकांना कचऱ्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, या मालकांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडेही देण्यात आली आहे. त्यानुसार कचरा करणाऱ्या मालकांवर कारवाई केली जाईल, असे पालिकेने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.गेल्या वर्षी ६४ वेळा पक्ष्यांनी विमानाला धडक दिली व त्याआधीच्या वर्षी ५२ वेळा हा प्रकार घडला आहे. याची दखल घेत न्यायालयाने येथील कचरा उचलण्याची हमी पालिकेची असून, यासाठी विशेष धोरण आखले गेले पाहिजे, असे मत गेल्या सुनावणीला व्यक्त केले होते. (प्रतिनिधी)