शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विभागात वाशिमचा डंका!

By admin | Updated: May 31, 2017 02:21 IST

अमरावती विभाग : बुलडाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी, अकोला ८९.८१ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात अमरावती विभागातून वाशिम जिल्हा प्रथम तर बुलडाणा जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.३१ टक्के, बुलडाणा जिल्हा ९०.८१ टक्के, अकोला जिल्ह्याचा निकाल ८९.८१ टक्के, अमरावती जिल्हा ८९.९५ टक्के तर यवतमाळ जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक कमी ८४.८० एवढा लागला आहे. सदर वृत्त लिहिस्तोवर लोकमतकडे प्राप्त असलेल्या माहितीनुसार, वाशिममधून विनिता बज, बुलडाण्यातून श्रुती भडेच तर अकोल्यातून शर्व पाटील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. वाशिम जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार ७४३ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९१.३१ अशी आहे. वाशिम येथील हॅपी फेसेस स्कूलची विद्यार्थिनी विनिता बजने ९४.९२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. बुलडाणा जिल्ह्याची निकालाची टक्केवारी यावर्षी वाढली असून, विभागातून दुसरा येण्याचा मान मिळाला आहे. यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९०.८१ टक्के लागला. निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९३.४९ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील ३१ हजार ९०० विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. जिल्ह्यातून श्रुती भडेच ९६.६१ गुणांसह प्रथम क्रमांकावर आली. श्रुती भडेच भारत विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.अकोला जिल्ह्याचा निकाल यावर्षी ८९.८१ लागला असून, यावर्षीदेखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.०१ तर मुलींची टक्केवारी ९३.१४ अशी आहे. जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान शर्व रणजित पाटील याने मिळवला आहे. शर्वने ९५.८५ टक्के गुण मिळवले असून, तो डवले कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.