शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम - पंचायत समितीतील गैरहजर कर्मचा-यांची ‘बिनपगारी’

By admin | Updated: August 29, 2016 16:33 IST

येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणा-या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो.

- नंदकिशोर नारे
 
वाशिम, दि.29  - येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणा-या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात लोकमतने २६ आॅगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान स्टिंग आॅपरेशन केले असता कार्यालयातील जवळपास सर्वच अधिकारी व कर्मचारी यांच्या खुर्च्या खाली आढळून आल्या होत्या या वृत्ताची दखल पंचायत समिती गटविकास अधिकारी बचुटे यांनी घेतली असून गैरहजर असणा-या कर्मचा-यांची त्या दिवसाची बिनपगारी करण्यात येणार आहे.
वाशिम पंचायत समितीमधील अनेक अधिकारी कर्मचारी अकोल्यासह बाहेरगावाहून येणे जाणे करीत असलयने त्यांना काार्यलयात पोहचण्यासाठी उशिर होतो तर कधी रेल्वे, बसची वेळ झाल्याने लवकर निघून जातात. यामुळे येथे येणा-या नागरिकांना, लाभार्थ्यंाना अधिकारी व कर्मचा-यांसाठी ताटकळत बसावे लागते. या संदर्भात लोकमतकडे अनेकांनी माहिती पुरविल्याने २६ आॅगस्ट रोजी स्टिंग आॅपरेशन केले असता सर्व कार्यालयचं खाली आढळून आले होते. त्यादिवशी स्वच्छ भारत मिशन, मुख्य कार्यकारी अधिकारी व नियामक मंडळाची मिटींगला काही अधिकारी गेले होते परंतु इतर अधिकारी, कर्मचारी कुठे गेले होते असा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देविदास बचुटे यांनी सोमवारी सभा घेवून या प्रकाराची चौकशी केली. तसेच या दिवशी जे कर्मचारी विना परवानगी गैरहजर आढळतील अशांची बिनपगारी करण्याच्या सूचना संबधितांकडे दिल्यात. तसेच कर्तव्यावर असतांना जे कर्मचारी जागेवर नव्हते व काही कारण नसतांना बाहेर गेले होते अशा कर्मचा-यांमध्ये कारवाईची भिती निर्माण झाली आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशी नंतर सदरचा अहवाल वरिष्ठ अधिका-यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी बचुटे यांनी दिली.