शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानात वाशिम जिल्हा अव्वल!

By admin | Updated: April 15, 2017 00:43 IST

वाशिम- स्वच्छ महाराष्ट्र या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्ह्याने पहिल्या पाचमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

स्वप्नातील भारत : अमरावती महापालिका दुसऱ्या स्थानावरवाशिम : ग्रामीण तथा शहरी भाग हगणदरीमुक्ती करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्ह्याने पहिल्या पाचमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर अमरावती महापालिकेने या अभियानात दुसरे स्थान पटकाविले असून, पुणे महानगरपालिका अव्वल स्थानी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाला केंद्र आणि राज्य शासनाकडून स्वच्छता अभियानाला महत्त्व दिले जात आहे. स्वच्छ भारत अभियानाच्याच धर्तीवर राज्यातील ग्रामीण भागातील खेडे आणि शहरे हगणदरीमुक्तीसाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हगणदरीमुक्तीसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका स्तरावर शासकीय अनुदानातून शौचालयांची निर्मिती केली जात आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीला प्रोत्साहन देण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची ‘टॉप’ फाइव्ह आणि नकारात्मक कामगिरी करणाऱ्या संस्थांची ‘बॉटम’ फाइव्ह अशी वर्गवारी करण्यात येत आहे. यामध्ये नवीन आणि जुन्या शौचालयाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये वाशिम जिल्ह्याने १५५ टक्के उद्दिष्टपूर्तीकरीत पहिले स्थान पटकाविले आहे. दुसरे स्थान कोल्हापूर (१०९ टक्के), तर तिसऱ्या स्थानी ठाणे जिल्हा (८५ टक्के) आहे. तर नकारात्मक कामगिरी करणाऱ्यांमध्ये गडचिरोली (२६ टक्के), यवतमाळ, जालना (४३ टक्के), परभणी (४४ टक्के) जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचवेळी महानगरपालिका क्षेत्रात पुणे महानगरपालिकेने (२७१ टक्के) पहिले स्थान पटकाविले असून, विदर्भातील अमरावती महानगरपालिका (१२७ टक्के) दुसऱ्या तर वसई विरार महापालिका (१०१ टक्के) तिसऱ्या स्थानी आहे.ग्रामीण भागात कारंजा दुसऱ्या स्थानी!स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये ग्रामीण क्षेत्रात पन्हाळा (४६७ टक्के) उद्दिष्टपूर्तीच्या माध्यमातून पहिल्या स्थानी आहे. ग्रामीण भागात कारंजा (४१८ टक्के) दुसऱ्या स्थानावर, तर अरधापूर (१६० टक्के) उद्दिष्टपूर्तीच्या माध्यमातून तिसऱ्या स्थानी आहे. ग्रामीण क्षेत्रात कामठी, घाटंजी, लोणार कमालीचे माघारले गेले आहे. कामठी येथे केवळ ९ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. त्याचप्रमाणे घाटंजी ११ आणि लोणार १६ टक्के उद्दिष्टपूर्तीसह पिछाडीवर आहेत.सुमार कामगिरी करणाऱ्या महापालिका!या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये राज्यातील महानगरपालिकांनी अतिशय सुमार कामगिरी केली आहे. यामध्ये ग्रेटर मुंबई (७ टक्के), परभणी (२४ टक्के) तर भिवंडी महानगरपालिकेने (२५ टक्के) उद्दिष्टपूर्ती केली आहे.