शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात गुप्तचर यंत्रणेकडून सावधानतेचा इशारा

By admin | Updated: March 6, 2016 03:36 IST

गुजरातमध्ये घातपाती कृत्य घडविण्यासाठी लष्कर- ए- तोयबाचे व जैश -ए- महंमद या अतिरेकी संघटनेचे दहा दहशतवादी घातपात घडविण्यासाठी दाखल झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिलेली आहे

जमीर काझी,  मुंबईगुजरातमध्ये घातपाती कृत्य घडविण्यासाठी लष्कर- ए- तोयबाचे व जैश -ए- महंमद या अतिरेकी संघटनेचे दहा दहशतवादी घातपात घडविण्यासाठी दाखल झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाच्या व्यक्ती व ठिकाणाची बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिने सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी सर्व घटकप्रमुखांना दिलेले आहेत. राज्यात मंगळवारपासून विधिमंडळाचे अधिवेशनाला सुरवात होत आहे, त्यापार्श्वभूमीवर घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा डाव असू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस मुख्यालयातून तातडीने दूरध्वनीवरुन सर्व पोलीस घटकांमध्ये हा संदेश देण्यात आला. त्यानंतर बिनतारी संदेश यंत्रणेवरुन त्याबाबतची माहिती प्रसारित करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुख्यालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली, त्यामध्ये गुजरातमध्ये लष्कर- ए- तोयबाचे व जैश -ए- महंमद या अतिरेकी संघटनेचे दहा अतिरेकी शिरलेले आहेत. त्यांच्याकडून घातपात होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांनी मुंबईसह सर्व पोलीस आयुक्त व अधीक्षकांना तातडीने संदेश पाठविला, त्यामध्ये म्हटले आहे की, आपल्या हद्दीत राहाणाऱ्या खासदार, सरकारी इमारती यांचे संरक्षण करावे, त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभारी अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीतील समाजकंटक, गुन्हेगारांच्या रहाण्याची ठिकाणे वेळोवेळी तपासावेत, हद्दीत सर्तकपणे सशस्त्र नाकाबंदी प्रभावीपणे राबवावी, व पोलीस मित्रांची मदत घेवून गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत.