शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी परतीच्या प्रवासाला...

By admin | Updated: July 6, 2017 04:24 IST

आषाढी एकादशीदिवशी पांडुरंगाचे दर्शन घेऊन, सुखसोहळा डोळ्यात साठवून भाविक परतीच्या प्रवासाला लागले़ पण

प्रभू पुजारी/ लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : आषाढी एकादशीदिवशी पांडुरंगाचे दर्शन घेऊन, सुखसोहळा डोळ्यात साठवून भाविक परतीच्या प्रवासाला लागले़ पण  ‘कन्या सासुराशी जाये, मागे परतुनि पाहे।तैसे झाले माझीया जीवा, केव्हा भेटसी केशवा।।’या अभंगाप्रमाणे पांडुरंगाची पंढरी सोडून जाण्याच्या हुरहुरीने अनेक भाविकांचे मन दाटून आले.सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस मनी घेऊन, आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आठ लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले होते़ भाविकांनी पवित्र चंद्रभागेत स्नान करून, पांडुरंगाचे दर्शन (पददर्शन, मुखदर्शन, नामदेव पायरी आणि कळस दर्शन) घेऊन हा सुखसोहळा डोळ्यात साठविला. काही भाविक मंगळवारी, तर काही बुधवारी आपले गाठोडे बांधून परतीच्या प्रवासाला लागले़ त्यामुळे पंढरपुरातील गर्दी ओसरू लागली आहे, तरीही दर्शनरांगेत अजून हजारोंच्या संख्येने भाविक उभे आहेत़ शहरातून बाहेर जाण्यासाठी शिवाजी चौक ते स्टेशन रोड, सोलापूर मार्गावरील पुलावर, तीन रस्ता, गोपाळपूर रस्ता, करकंब रस्ता, रेल्वे स्टेशन, चंद्रभागा बसस्थानक आदी ठिकाणी वारकऱ्यांची दाटी झाली होती़ आषाढी एकादशीदिवशी रात्री १२ ते ३ पर्यंत तीन तास नित्यपूजा, शासकीय पूजेसाठी पददर्शन बंद ठेवण्यात आले होते़ मात्र, द्वादशीला पहाटे केवळ नित्यपूजेसाठी तासभर दर्शनरांग बंद ठेवण्यात आली होती़ तुलनेने दोन तास अधिक वेळ दर्शन सुरू असल्याने, एकादशीपेक्षा द्वादशीला बुधवारी अनेक भाविकांनी दर्शन घेतले.प्रसादाच्या दुकानांमध्ये गर्दीपरतणाऱ्या वारकऱ्यांनी प्रसाद म्हणून पेढा, चुरमुरे, बत्ताशे, हळदी-कुंकू, बुक्का खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केली होती. अनेकांनी घरातील बालगोपाळांसाठी टाळ किंवा खेळणी घेतली़ महिला भाविक समई, पणत्या, पंचपाळ यासह संसारिक साहित्याची खरेदी करताना दिसत होत्या.