शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

वारक:यांसाठी 57 रुग्णवाहिका

By admin | Updated: June 24, 2014 00:39 IST

आरोग्याच्या सोयीसाठी आणि अपघात झाल्यास तातडीची सेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सरसावला आहे.

अरुण बारसकर - सोलापूर
पंढरीत आषाढी वारीसाठी देशभरातून लाखो भाविक पायी येत असतात. त्यांच्या आरोग्याच्या सोयीसाठी आणि अपघात झाल्यास तातडीची सेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सरसावला आहे. याच उद्देशाने पहिल्यांदाच 57 रुग्णवाहिका वारी मार्गावर सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.  शिवाय पंढरपुरात 12 ठिकाणी या रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत.
आषाढी वारीसाठी येणा:या संत ज्ञानेश्वर व जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत तसेच पंढरपुरात  ‘महाराष्ट्र एमजर्सी मेडिकल सव्र्हिसच्या 57 रुग्णवाहिकांद्वारे अद्ययावत आरोग्य सेवा दिली जाणार आहे.  दरवर्षी  पंढरीत आषाढी एकादशिनिमित्त वैष्णवांचा मेळा जमतो. काही वर्षापासून वारक:यांची संख्या वाढत आहे. आषाढीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी श्रीक्षेत्र देहू तर संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी श्रीक्षेत्र आळंदीहून पंढरपूरला निघते. पालखीच्या प्रस्थानांपासून पंढरपूर्पयत वारक:यांची संख्या वाढत जाते. एकादशीदिवशी तर पंढरपूर वारक:यांनी गजबजून जाते. 
ऐन पावसाळ्याचे दिवस व एकाच वेळी होणारी वारक:यांची गर्दी लक्षात घेऊन आरोग्य सेवा तत्परतेने मिळण्यासाठी या वर्षी अधिक दक्षता घेण्यात आली आहे. 
पुणो, सातारा व सोलापूर जिल्ह्यात पालखीसोबत विविध ठिकाणी 57 रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. नेमून  दिलेल्या ठिकाणी या रुग्णवाहिका थांबणार असून, रुग्णवाहिकांमध्ये औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
सोलापूर जिल्ह्यात पालख्यांचा प्रवेश झाल्यानंतर या रुग्णवाहिका नियुक्त ठिकाणी थांबणार आहेत.  पंढरपूर शहरात पालख्या आल्यानंतर त्या पंढरपूर शहरातील  प्रमुख ठिकाणी थांबणार आहेत.
 
जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा
पालखी मार्गावर 93 पथक राहणार असून, प्रत्येक पथकामध्ये तीन कर्मचारी, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी व कर्मचा:यांचे पथक राहणार आह़े याशिवाय पालखी मार्गावरील 4क् आरोग्य केंद्राचे 8क् वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्या-त्या ठिकाणी सेवा बजावतील़
 
च्सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टरांची संख्या पुरेशी आहेच. याशिवाय  बाहेरच्या जिल्ह्यातील 6क् वैद्यकीय अधिका:यांची मागणी केली आहे. वारक:यांच्या आरोग्याची सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे, असे सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी सुनील भडकुंबे यांनी सांगितले.
 
वाळवंटात थांबणार दोन रुग्णवाहिका
मार्केट यार्ड (नवीन चंद्रभागा बसस्थानक), पोलीस स्टेशन, सावरकर पुतळा, रेल्वे स्टेशन, गोपाळपूर रोड, नवीन कराड नाका, इसबावी डेअरी, उपजिल्हा रुग्णालय, तीन रस्ता सोलापूर रोड (नदीच्या पलीकडे), सांगोला रोडवर प्रत्येकी एक तर वाळवंटात दोन रुग्णवाहिका थांबविल्या जाणार आहेत.