शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा: दोन चिमुकल्यांसह मातेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 13:43 IST

दोन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना वर्ध्यातील किन्हाळा येथे घडली.

ऑनलाइन लोकमत
समुद्रपूर (वर्धा), दि. २६ -  दोन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ही हृदयद्रावक घटना समुद्रपूर तालुक्यातील किन्हाळा या गावात घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये तुषार गजानन अवचट (५), अनुष्का गजानन अवचट (९) व पूनम गजानन अवचट यांचा समावेश आहे.
किन्हाळा येथील दादाजी अवचट यांचा एकमेव मुलगा गजानन यांचा राळेगाव तालुक्यातील वणोजा येथील हनुमान उगेमुगे यांची मुलगी पुनम सोबत १० वर्षापुर्वी विवाह झाला होता. या कालावधीत त्यांच्या संसाराच्या वेलीवर अनुष्का (९) व तुषार (५) ही दोन फुले उमलली. सुखात संसार सुरू होता. अनुष्का हिंगणघाटच्यास गुरूकुल कान्व्हेंटमध्ये दुसऱ्या वर्गात जात होती. तर तेथेच तुषार नर्सरीमध्ये जात होता. घरी ८ एकर शेती, गजानन एकटाच असल्याने संपूर्ण शेतीचा कारभार गजाननची पत्नी पुनम पाहायची. मात्र यातच कुणाची तरी नजर लागावी याप्रमाणे घरामध्ये सासु-सासराच्या वादामुळे पुनमने दोन्ही मुलासह आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सासरे दादाजी अवचट व सासु ही अर्धांग वायुने आजारी आहे.  मात्र या दोघामध्ये कश्याच्या तरी संबंधात वाद झाला. तेव्हा पुनमला वाटल की लोक म्हणतील सुनेमुळेच सासुसासरे भांडतात व त्याचेच तिच्या डोक्यात घर केले होते, असेही बोलले जात आहे.
सोमवारी सकाळी तुषार हा शाळेत गेला होता तर मुलगी अनुष्काला तीने शाळेत जाण्यासाठी मनाई केली होती. मुलगा शाळेतून आल्यावर जेवन घेतले व ३ वाजताचे दरम्यान बाहेर खेळत असलेल्या तुषार व अनुष्काला घेवून पुनम शेताकडे निघाली. तेव्हा रस्त्यात गावातील एक म्हातारा भेटला तेव्हा त्याने विचारपूस केली. पाऊस येण्याची शक्यता आहे व यामध्ये मुलांना घेवून कुठे जात आहे. तेव्हा शेतात जाऊन येते, असे तीने सांगितले व पुढे जाऊन पुंडलिक बदकल यांचे शेतातील विहिरीत मुलासह उडी घेवून आत्महत्या केली.
सदर महिलेचा शोध घेतला असता आज तिघाचेही मृतदेह विहिरीत आढळून आले. घटनास्थळ गावापासून दोन किलोमिटर अंतरावर आहे. तीथे संपूर्ण गाव विहिरीवर गोळा झाले होते. विहिरीत तरंगत असलेल्या गोंडस मुलांकडे पाहून महिला हंबरडा फोडत होते.पुनमच्या माहेरच्या मंडळींनी आक्षेप नोंदवित घरच्याच्या त्रासापायीच आत्महत्या केली. तिला तिच्या कुटुुंबियांनी आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याची वडील हनुमान उगेमुगे यांनी समुद्रपूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास ठाणेदार रणजितसिंह चव्हाण यांचे मार्गदर्शनात समुद्रपूर पोलीस करीत आहे.