शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

प्रभाग तयार झाले, पण अधिकाऱ्यांचे काय?

By admin | Updated: June 29, 2016 03:02 IST

महापालिकेत नव्याने निर्माण झालेल्या दोन प्रभागांना अजूनही अधिकारीच मिळालेला नाही.

कल्याण : महापालिकेत नव्याने निर्माण झालेल्या दोन प्रभागांना अजूनही अधिकारीच मिळालेला नाही. त्यामुळे तेथे नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. प्रभाग अधिकारी पदाच्या समकक्ष अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी महापालिकेत असतानाही लेखापाल अथवा अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या माथी हे पद मारले जात आहे.केडीएमसीत २७ गावे समाविष्ट झाल्यामुळे प्रभागांची संख्या १०७ वरून १२२ इतकी झाली. परिणामी अ, ब, क, ड, फ, ग, ह या सात प्रभागांबरोबर नव्या ‘ई’ या प्रभागाची निर्मिती झाली. तेथे नवीन प्रभाग अधिकाऱ्याची नियुक्तीही झाली. दरम्यान प्रभाग रचनेनुसार झालेल्या बदलात आणखी दोन नव्या प्रभागांची त्यात भर पडली. प्रभाग रचनेनुसार १ ते १० क्रमांकानुसार प्रभागांची निर्मिती करण्यात आली. आधीच्या ‘ड’ आणि ‘ई’ प्रभागांचे विभाजन करून दोन नवे प्रभाग निर्माण करण्यात आले. नुकत्याच प्रभाग अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. परंतु, नव्या प्रभागांमध्ये प्रभाग अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. चिंचपाडा व लोकग्राम परिसरात नव्या प्रभागांची कार्यालये थाटण्यात येणार आहेत.सध्या महापालिकेत अनिल लाड, सुभाष भुजबळ, प्रकाश ढोले, मिलिंद धाट, गणेश बोराडे, लहू वाघमारे, विनय कुलकर्णी हे सहाय्यक आयुक्त आहेत. हे प्रभाग अधिकारी समकक्ष दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांची नेमणूक प्रभाग अधिकारी म्हणून करणे अपेक्षित असताना त्यांना मात्र अन्य विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. ते प्रभाग अधिकारी म्हणून काम करण्यास तयार नसल्याने या महत्त्वाच्या पदावर लेखापाल, अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. >महिलेच्या हाती कारभार?नव्या प्रभागांची जबाबदारी कोणावर सोपवायची, असा प्रश्न केडीएमसी प्रशासनाला पडला आहे. एका महिलेला प्रभाग अधिकारी पद देण्याचा विचार करण्याची वेळ प्रशासनावर ओढावल्याची सूत्रांची माहिती आहे. >नियुक्तीची प्रक्रिया सुरू यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद धाट यांच्याशी संपर्क साधला असता प्रभाग अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच नवीन प्रभागांत अधिकारी नेमले जातील, असे त्यांनी सांगितले.