शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचना होणार २५ नोव्हेंबरला जाहीर

By admin | Updated: November 4, 2016 01:30 IST

महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवरील सूचना आणि हरकतींचा शासकीय सोपस्कार निवडणूक आयोगाने पूर्ण केला.

पिंपरी : महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवरील सूचना आणि हरकतींचा शासकीय सोपस्कार निवडणूक आयोगाने पूर्ण केला. सुनावणीचा अहवाल १९ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाकडे देण्यात येणार असून, २५ नोव्हेंबरला अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी व राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी दिली.फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. त्यावरील सूचना आणि हरकतींविषयी आज आॅटो क्लस्टर सभागृहात सुनावणी झाली. या वेळी कुंटे यांच्यासह विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी गुट्टूवार, जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त दिनेश वाघमारे, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने आदी उपस्थित होते. एकू ण १४३० सूचना आणि हरकतींपैकी १३०० हरकती या तळवडे भागातील होत्या. त्यामुळे सभागृह भरले होते. जागा अपुरी असल्याने काही नागरिक उभेही राहिले. समितीने या हरकतदारांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर अन्य भागातील सूचना आणि हरकतदारांचे म्हणणे निवडणूक आयोगाने ऐकून घेतले. तळवडे आणि चिखलीची मोडतोड करून प्रभागरचना चुकीची केली आहे. हे नागरिकांनी समितीच्या लक्षात आणून दिले. एकूण २५ जणांनी आपले म्हणने मांडले. तळवडेतील सूचना आणि हरकतींनंतर सुनावणी झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत हे काम सुरू होते. (प्रतिनिधी)>हरकतदारांनी आपली बाजू मांडली. समितीनेही नागरिकांची बाजू समजून घेतली आहे. याबाबतचा अहवाल येत्या १९ तारखेला निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर २५ नोव्हेंबरला अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येईल.- सीताराम कुंटे, प्रधान सचिव