शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग अधिकारी होणार आता सहायक आयुक्त

By admin | Updated: February 15, 2016 03:53 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रभागांची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पदांचे नामकरण होणार असून ते आता ‘सहायक आयुक्त’ होतील

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रभागांची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पदांचे नामकरण होणार असून ते आता ‘सहायक आयुक्त’ होतील. शनिवार (२० फेब्रुवारी) च्या महासभेसाठी पदनामबदलाचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने दाखल करण्यात आला आहे. कामकाजात सुसूत्रता आणणे आणि उद्भवणाऱ्या समस्यांचे विहित कालावधीत निराकरण करणे, या अनुषंगाने हा बदल सुचवण्यात आला आहे. केडीएमसी क्षेत्रात अ, ब, क, ड, फ, ग, ह, ई असे आठ प्रभाग आहेत. या प्रभाग कार्यालयांकडील दैनंदिन प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या वतीने प्रभागक्षेत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रभाग अधिकारी म्हणून ८ पदे मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी आजच्या घडीला लहू वाघमारे, अरुण वानखेडे आणि शांतिलाल राठोड या प्रभाग अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य प्रभाग अधिकारी ‘प्रभारी’ आहेत. तर, सहायक आयुक्त म्हणून काहींना मंजुरी मिळाली असली तरी कलम ४५ अन्वये शासनाची अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही. दरम्यान, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर दाखल झालेले संजय शिंदे आणि मिलिंद धाट हे दोघे सहायक आयुक्त म्हणून केडीएमसीत कार्यरत आहेत. शनिवारच्या महासभेत प्रभाग अधिकारी या पदनामाऐवजी ‘सहायक आयुक्त’ असा बदल करण्यास मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. यामुळे प्रभाग स्तरावरील कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणणे व उद्भवणाऱ्या समस्यांचे विहित कालावधीत निराकरण करून लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टिकोनातून प्रभाग स्तरावर नियुक्त अधिकाऱ्यांच्या पदनामात बदल करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. २८ सप्टेंबर २०१५च्या स्थायी समितीच्या सभेत पदनामबदल करण्याचा ठराव मंजूर झाल्याचेही दाखल केलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)