शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वॉन्टेड अखिलेश पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: November 5, 2016 06:32 IST

मीरा रोड बोगस कॉलसेंटरप्रकरणी वॉन्टेड असलेला अखिलेश अजय सिंग (२९) याला बेड्या घालण्यात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा-१च्या पथकाला अखेर यश आले.

ठाणे : मीरा रोड बोगस कॉलसेंटरप्रकरणी वॉन्टेड असलेला अखिलेश अजय सिंग (२९) याला बेड्या घालण्यात ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा-१च्या पथकाला अखेर यश आले. या प्रकरणी आतापर्यंत ५० जणांना अटक झाली आहे. अखिलेशला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.अखिलेश हा मीरा रोड येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश खुस्पे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला गुरुवारी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने मीरा रोड येथील हरीओम आय.टी. पार्क बिल्डिंगचा दुसरा आणि चौथा माळा त्याचा मेहुणा चंदन अजित सिंह याच्या नावाने तसेच पाचवा आणि सातवा माळा त्याचा मित्र सनी परियाल याच्या नावे स्वत: आर्थिक व्यवहार करून भाडेकरारावर घेतल्याची कबुली दिली. यावरून त्याचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला नंतर अटक केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. ४ आॅक्टोबर रोजी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील मीरा रोड येथील हरीओम आय.टी. पार्क, ओसवाल पॅरेडाईज आणि एम बाले हाउस येथे ठाणे गुन्हे शाखेने छापा टाकला होता. या प्रकरणी बेकायदेशीर कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांना इंटरनल रेव्हेन्यु सर्व्हिसचे अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांना तुम्ही टॅक्स डिफॉल्टर असल्याचे खोटे सांगत तुम्हास अटक होऊन शिक्षा होईल, असे सांगून अमेरिकतील नागरिकांकडून तडजोडीअंती रक्कम स्वीकारून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी एकूण ४९ जणांना अटक झाली होती. या प्रकरणी पाहिजे असलेल्या अखिलेशला अटक केल्याने हा आकडा ५०वर गेला आहे. (प्रतिनिधी)