लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तुमच्याकडे लघुपटनिर्मितीची क्षमता आहे, परंतु संधी मिळत नाही, चांगले व्यासपीठ मिळत नाही, अशी खंत आहे का? असे असेल तर www.7rcfilms.com (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.7आरसीफिल्मस्.कॉम) घेऊन येत आहे एक अनमोल संधी, जी तुम्हाला नेऊ शकेल यशाच्या शिखरावर. आम्ही आयोजित करीत आहोत, जगातले सगळ्यात भव्य असे मराठी शॉर्टफिल्म्सचे फेस्टिव्हल. तुमच्यातील हरहुन्नरी कलाकार जगाला दाखवायला हीच एक संधी आहे.तुम्ही गणिताचे शिक्षक आहात की फोटोग्राफर? अकाउंटंट आहात की इंजिनीअर... याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. तुमच्यामध्ये शॉर्टफिल्म बनविण्याचे, फिल्ममेकर बनण्याचे वेड असणे महत्त्वाचे. जर तुमचे काम आम्हाला पसंत पडले, तर तुमचे चित्रपटनिर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असू एक पार्टनर म्हणून...त्याखेरीज अन्य बक्षिसे आहेतच, ज्यामध्ये मॅकबुक एअर लॅपटॉप्स, प्रोफेशनल कॅमकॉर्डर्स आणि स्मार्ट फोन्सचा समावेश आहे.तर सामील व्हा, जगातील सगळ्यात भव्य अशा मराठी लघुपटनिर्मिती स्पर्धेमध्ये. नोंदणी आणि शॉर्टफिल्म सबमिट करण्यासाठी लॉग आॅन करा www.7rcfilms.com. जर तुमच्या ओळखीचा कुणी होतकरू लघुपटनिर्माता असेल, तर त्याला हा मेसेज लगेच फॉरवर्ड करायला विसरू नका. कारण १४ जुलै २०१७ रोजी संध्याकाळी ६ वाजता नोंदणी बंद होणार आहे.
फिल्ममेकर व्हायचे आहे? मग ही बातमी वाचाच!
By admin | Updated: June 22, 2017 05:03 IST
तुमच्याकडे लघुपटनिर्मितीची क्षमता आहे, परंतु संधी मिळत नाही, चांगले व्यासपीठ मिळत नाही, अशी खंत आहे का?
फिल्ममेकर व्हायचे आहे? मग ही बातमी वाचाच!
Get, Set….SHOOT!
www.7rcfilms.com