पाथर्डी (अहमदनगर) : ‘भटक्यांची पंढरी’ अशी ओळख असलेल्या मढी यात्रेला बुधवारी राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांनी हजेरी लावली. कानिफनाथ महाराजांचा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद अशा भक्तीमय वातावरणात मढी परिसर दुमदुमून गेला. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत तीन टप्प्यांमघ्ये ही यात्रा चालते़ कानिफनाथ महाराजांनी रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने तो दिवस मुख्य समजला जातो. मानाच्या काठ्या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. त्याला ‘अस्त्यान्या’ म्हणतात. विविध जिल्ह्यांतील अनेक मानाच्या काठ्या वाजत गाजत सजवून आणून भाविक मंदिराच्या शिखराला टेकवित होते. अनेक भाविक रेवड्यांची उधळण करीत होत़े (प्रतिनिधी)
‘भटक्यांची पंढरी’ दुमदुमली!
By admin | Updated: March 12, 2015 01:47 IST