शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वॉलमार्ट राज्यात करणार ९०० कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: July 13, 2017 05:09 IST

प्रख्यात अमेरिकन कंपनी वॉलमार्ट आता महाराष्ट्रात मॉल्सचे जाळे उभारणार

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रख्यात अमेरिकन कंपनी वॉलमार्ट आता महाराष्ट्रात मॉल्सचे जाळे उभारणार असून त्या संदर्भातील करार बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आला. पहिल्या टप्प्यात वॉलमार्ट १५ ठिकाणी मॉडर्न होलसेल कॅश अँड कॅरी स्टोअर्स उभारणार आहे. त्याद्वारे ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. एकूण ३० हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. त्यात प्रामुख्याने महिला, स्थानिक बचत गट यांचा समावेश असेल. मेक इन इंडियांतर्गत ‘इझ आॅफ डुर्इंग बिझनेस’साठी शासनाने शासनाने किरकोळ व्यापार धोरण ११ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केले होते. त्या अंतर्गत वॉलमार्टच्या मॉल्सची उभारणी करण्यासाठीची प्रक्रिया अतिशय सुलभ केली जाणार आहे. कंपनीला आवश्यक असलेल्या परवानग्या विहित वेळेत दिल्या जातील. आजच्या करारप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, वॉलमार्ट इंडियाचे अध्यक्ष क्रिश अय्यर उपस्थित होते.महिला कौशल्य विकासासाठी शासन-गोदरेजमध्ये करारगोदरेज कंपनी आता कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) यांच्याबरोबर एकत्र येऊन महिला सक्षमीकरणात महत्त्वाचा सहभाग नोंदवेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.राज्य शासनाचा कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, गोदरेज अ‍ॅण्ड बॉयस आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्यात सांमजस्य करार झाला. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, आयुक्त ई. रवींद्रन, गोदरेज कंपनीचे फिरोजा गोदरेज, न्यारिका होळकर, अनुप मॅथ्यू, सीमा तिवारी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, सामंजस्य करारानुसार महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. हा करार सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) भाग आहे. हा करार हा एक वषार्साठी असून त्यानुसार दोन हजार महिलांचे उद्योग व्यवसायासाठी सक्षमीकरण करण्यात येईल. निलंगेकर म्हणाले की, मेक इन इंडियानंतर कौशल्य विकासासाठी झालेला हा ६२ वा करार आहे.मॅनग्रोव्हन अ‍ॅपचे उद्घाटनमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मॅनग्रोव्हन अ‍ॅपचा प्रारंभ झाला. या अ‍ॅपमध्ये खारफुटीचे संरक्षण संवर्धन कसे करावे, याबाबत माहिती देण्यात आली आहे.