शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मनोरुग्णालयाला साडेपाच कोटींची तटबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 03:49 IST

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयास साडेपाच कोटींची तटबंदी उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- रुग्णांसह डॉक्टर आणि साधनसामग्रीच्या संरक्षणासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयास साडेपाच कोटींची तटबंदी उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षितेत भर पडून असामाजिक घटकांचा प्रवेश रोखला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या सीमाभिंतीचा प्रश्न खितपत पडला होता. मात्र, शासनाने आता ती बांधण्याचा निर्णय घेतल्याने हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाची जवळपास ६० एकरहून अधिक जागा असून या जागेत अतिक्रमण वाढू लागले आहे. तसेच, आसपास राहणारे नागरिक याठिकाणी कचराही टाकत आहेत. या मनोरुग्णालयाला सिमाभिंतच नसल्याने यापूर्वी रुग्ण पळून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. यासर्व समस्या लक्षात घेता या ठिकाणी लवकरच ही सिमाभिंत उभारली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालय आणि रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षतेत येणाऱ्या बाधेला आळादेखील बसणार आहे. यात सर्व्हंट कॉर्टर जवळ, ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ असलेला नाल्याचा भाग, एसीसी कंपनीच्या उत्तर दिशेची बाजू, एसीसी कंपनी ते ३२ नर्स कॉर्टरच्या उत्तर दिशेची बाजू, रेल्वे लाईन व बंजारा वस्ती जवळ अशा आठ ठिकाणी ही सिमाभिंत बांधली जाणार आहे. भिंतीसाठी पाच कोटी ४५ लाख पाच हजार ८०५ रुपये मंजूर झाले आहेत. याआधी चार कोटी ९७ लाख चोवीस हजार ९०६ रुपयांची तरतूद केली होती. त्यात सुधारणा करुन ती आता पाच कोटींची केली आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.