शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

घराची भिंत अंगावर पडून वृद्धाचा मृत्यू

By admin | Updated: June 6, 2017 01:36 IST

भिंत अंगावर पडून ८५ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना भाटनिमगाव गावच्या हद्दीत चव्हाणवस्ती येथे रविवारी (दि. ४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : वादळी पावसाने घराची भिंत अंगावर पडून ८५ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना भाटनिमगाव गावच्या हद्दीत चव्हाणवस्ती येथे रविवारी (दि. ४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.बाबा निवृत्ती कांबळे (वय ८५, रा. चव्हाणवस्ती, भाटनिमगाव) असे मरण पावलेल्या वृद्धाचे नाव आहे.यासंदर्भात त्याचा नातू गणेश अशोक कांबळे (रा. चव्हाणवस्ती) याने इंदापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. ठाणे अंमलदार अजीज शेख यांनी सांगितले, की रविवारी भाटनिमगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्या पावसात घरावरील पत्रा उडून गेला. बाबा कांबळे यांच्या अंगावर भिंत कोसळली. त्यांना उपचारासाठी इंदापूरला आणण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशा आशयाच्या खबरीवरून अकस्मात मृत दप्तरी या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तहसीलदार श्रीकांत पाटील व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.वीज पडून गायीचा मृत्यूबारामती शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. आज शहरात रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला. जिरायती भागात मोरगाव परिसरात पहिल्याच दमदार पावसाने हजेरी लावली. सुपे परिसरात अद्यापपर्यंत पावसाने पाठ फिरविलेली आहे. जळगाव कप परिसरात वीज पडून गायीचा मृत्यू झाला.बारामती तालुक्यातील जळगाव कप येथे वीज पडून सुखदेव वामन खोमणे या शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू झाला. आज जिरायती भागात प्रथमच मोरगाव परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र, सुपे परिसर अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे.बारामती शहरात सोमवारी दुपारपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ४.३० वाजता पाऊस सुरू झाला. सुमारे अर्धा तास पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर मात्र, शहरात रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसात अनेक नागरिकांनी चिंब भिजण्याचा आनंद लुटला.इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर येथे जोरदार पाऊस झाला. या पावसाने ओढे-नाले वाहिले. शेतांमध्ये पाणी साठल्याने शेततळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.