शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्गाने दाखवली जगण्याची वाट

By admin | Updated: June 29, 2016 21:18 IST

लहान मुलांची छोटी बाबागाडी, त्यावर फुगे, विविध प्रकारची खेळणी अशा अनेक वस्तू विक्रीस मांडून पालखी सोहळ्याबरोबर मजल दरमजल करणारे सुमारे अडीचशे छोटे व्यावसायिक पालखी मार्गावर भेटले

ऑनलाइ लोकमतपिंपरी, दि. २९ : लहान मुलांची छोटी बाबागाडी, त्यावर  फुगे, विविध प्रकारची खेळणी अशा अनेक वस्तू विक्रीस मांडून पालखी सोहळ्याबरोबर मजल दरमजल करणारे सुमारे अडीचशे छोटे व्यावसायिक पालखी मार्गावर भेटले. हे छोटे व्यावसायिक अडथळा ठरत नाहीत, तर एक प्रकारे पालखी सोहळ्याची शोभा वाढवितात. श्रीक्षेत्र देहू, आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंतच्या मार्गावर त्यांना उदरनिर्वाहाचे साधन मिळते. खेळणी विक्रीतून अवघ्या वीस दिवसांत ते हजारो रुपयांची कमाई करतात. त्यांची लाखो रुपयांची उलाढाल होते. अनेक वर्षांपासून अशा प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांनी पालखी मार्गाने जगण्याची वाट दाखवली, अशा भावना व्यक्त केल्या. श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. आकुर्डीतील पहिल्या मुक्कामानंतर सकाळीच पालखी पुण्याच्या दिशेने निघाली. या पालखी सोहळ्याबरोबर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या बाजूने छोट्या व्यावसायिकांची बाबा गाड्यांची रांग लागल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. बाबागाडीवर लहान मुलांना आकर्षित करणारी विविध प्रकारची खेळणी, फुगे, पिपाण्या अडकवलेल्या. त्याबरोबर बाबागाडीला मध्ये बांधलेल्या कापडी झोक्यात बाळ झोपलेले. दुसऱ्या बाजूला स्वयंपाकासाठी लागणारा स्टोव्ह अडकवलेला. एकीकडे अडवलेल्या पिशवीत कपडे असे सर्व काही घेऊन  विंचवाच्या पाठीवर बिऱ्हाड या उक्तीप्रमाणे छोट्या व्यावसायिकांचा लवाजमा दृष्टिपथास येत होता. पालखी सोहळ्याचे तसेच त्यातील वारकऱ्यांच्या दिंड्या यांचे व्यवस्थापन कौतुकास्पद वाटते. पालखी सोहळ्याबरोबर चालणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे व्यवस्थापनसुद्धा दखल घेण्यासारखे आहे. संत तुकाराम पालखी सोहळ्यात वारीच्या रांगेच्या बाजूने मार्गक्रमण करणारे हे छोटे व्यावसायिक ज्या ठिकाणी थांबतील, त्या ठिकाणी जत्राच भरते. काही विक्रेते लोणी काळभोरपर्यंत, तर काही पुढे सासवडपर्यंत जातात. काही जण बाबागाडी घेऊन थेट पंढरपूरपर्यंत जातात. कोणी मुंबईहून, कल्याण येथून, तर कोणी मराठवाड्यातून आले आहे.बहुतांश परप्रांतीय हिंदी भाषिक आहेत. २०हून अधिक वर्षे झाली, दर वर्षी न चुकता पालखी सोहळ्यात खेळणी विक्रीसाठी येत असतो, असेही अनेकांनी सांगितले. गंगा सूरज पवार ही महिला म्हणाली, पालखी सोहळ्यात २० ते २५ हजारांची कमाई होते. पालखी सोहळ्यानंतर राहत असलेल्या परिसरात फिरून कपडे, बेडसीट विक्रीचा व्यवसाय करतो. रश्मी तसेच आर्या या महिलांनीसुद्धा खेळणी विक्रीतून पालखी मार्गावर समाधानकारक कमाई होते,असे नमूद केले. मराठवाड्यातून आलेल्या एकाने पालखी मार्ग जगण्याची वाट दाखविणारा मार्ग ठरला असल्याच्या भावना व्यक्त केल्या. ..................................... खेळणी विक्रेत्यांची लाखोंची उलाढालपालखी सोहळ्याबरोबर चालणारे खेळणी विक्रेते आषाढी वारीच्या काळात हजारो रुपयांची कमाई करतात. या विक्रेत्यांना खेळणी आणि कच्चा माल पुरवठा करणारी मोठी यंत्रणा आहे. उल्हासनगरमधून त्यांना पालखी मार्गावर वेळोवेळी आवश्यकतेनुसार माल उपलब्ध करून दिला जातो. छोट्याशा बाबागाडीवर खेळणी व अन्य विक्री साहित्य ठेवण्यास पुरेशी जागा नसते. मोठ्या प्रमाणावर माल घेऊन बाबागाडी ढकलणे अवघड जाते. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना माल पुरविणारी वाहने पालखी मार्गावरच फिरत असतात. विशिष्ट ठिकाणी त्यांना माल उपलब्ध करून दिला जातो. खेळणी विक्रेत्यांना २० ते २५ हजारांची कमाई होते, तर त्यांना माल पुरविणारे लाखो रुपये इकमावतात. अशा प्रकारे छोट्या व्यावसायिकांचे पालखी मार्गावरील व्यावसायिक अर्थकारण चालते.