शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉक इन इंटरव्ह्यू’ होणार

By admin | Updated: February 28, 2016 02:15 IST

सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची गट अ ची तब्बल ११०० पदे भरण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता

- यदु जोशी,  मुंबईसार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची गट अ ची तब्बल ११०० पदे भरण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. विदर्भ व मरावाड्यातील १४ जिल्ह्यांत डॉक्टरांची जवळपास ५०० पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत न भरता, ती ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ने भरण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. आत्महत्याग्रस्त भागांतील सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीने आवश्यकता आहे. अशा वेळी एमपीएससीद्वारे भरती करण्यास विलंब होईल, हे लक्षात घेऊन, ‘वॉक इन इंटरव्ह्यू’द्वारे भरतीची परवानगी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली होती. ती देण्यात आल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे. डॉ. सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आत्महत्याग्रस्त भागानंतर राज्याच्या इतर भागांतील रिक्त पदे भरण्यात येतील आणि तिथेही ‘वॉक इन इंटरव्ह्यू’द्वारेच भरती केली जाईल. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती भरती करेल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त हे समितीचे सदस्य असतील. मराठवाड्यातील ८, अमरावती विभागातील सर्व ५, तसेच नागपूर विभागातील वर्धा असे १४ जिल्हे आत्महत्याग्रस्त आहेत. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची थेट भरती करताना आरक्षणानुसारच करण्यात येणार आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी नाही, तिथे भरती करण्यास प्राधान्य दिले जाईल. एकूण रिक्त पदांच्या ७५ टक्के पदे भरण्यात येणार आहेत. नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयातच राहणे अत्यावश्यक असेल.वर्ग क, ड ची ३ हजार पदे भरणारसार्वजनिक आरोग्य विभागात वर्ग क (तृतीय श्रेणी) आणि वर्ग ड ची (चतुर्थश्रेणी) ३ हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असून, लेखी परीक्षा लवकरच घेतली जाईल, असे आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. दुसऱ्या टप्प्यात ३ हजार आणि तिसऱ्या टप्प्यात आणखी ३ हजार अशी एकूण किमान ९ हजार पदे नजीकच्या काळात भरण्यात येतील.एमडीमुळे ‘रिक्त’ पदे भरण्याचा प्रस्तावएमबीबीएस झालेले आरोग्य अधिकारी एमडी करण्यासाठी गेल्यानंतर, तो जिल्हा वा अन्य इस्पितळात सेवा देतो, पण त्याचे वेतन आधीच्या ठिकाणीच निघते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते पद भरलेलेच असते आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रात डॉक्टर कागदावरच राहतात. या पार्श्वभूमीवर, एमडीसाठी गेलेल्या आरोग्य अधिकाऱ्याची पदे हंगामी स्वरूपात भरण्याचा प्रस्ताव आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे.