शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वखार महामंडळ घोटाळ्याचा अकोल्यात बळी

By admin | Updated: February 5, 2016 02:29 IST

अकोल्यात कंत्राटदाराची गळफास घेऊन आत्महत्या.

यदु जोशी/ नितीन गव्हाळे/ मुंबई/ अकोला : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात कंत्राटदारांचे रॅकेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत असून नवीन कंत्राटदारांच्या निविदा मंजूर होणारच नाहीत, अशा पद्धतीने संगनमत केले जात असल्याचे लोकमतने दिलेले वृत्त ताजे असतानाच या रॅकेटचा फटका बसलेल्या अकोला येथील एका कंत्राटदारांने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली.संतोष सावजी (४२) असे या कंत्राटदाराचे नाव असून 'मी टेंडर भरायला नको होते. ते भरण्याची मी चूक केली. मोठमोठय़ा लोकांमध्ये मी मोठय़ा रकमेचे टेंडर भरले. माझ्या कुटुंबाला वाचविण्यासाठी मी आत्महत्या करीत आहे,' असे सावजी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सावजी हे वखार महामंडळाच्या अन्नधान्य वाहतुकीच्या निविदा नियमितपणे भरत असत. गेली १0-१२ वष्रे ते या व्यवसायात होते. मात्र अलिकडे सावजी हे काही बड्या कंत्राटदारांच्या जाचाला त्रासले होते. त्यांनी जादा दराच्या निविदा भराव्यात किंवा निविदाच भरू नयेत, यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव येत होता, अशी माहिती आहे.वखार महामंडळातील कंत्राटदार, पुणे येथील मुख्यालयाचे अधिकारी आणि वेगवेगळ्या जिलंतील काही अधिकारी यांच्या संगनमताने विशिष्ट कंत्राटदारांचेच चांगभले होत असल्याची उघड चर्चा आहे. तसेच गेल्या ६-७ वर्षांत अव्वाच्या सव्वा दराने अन्नधान्य पुरवठय़ाची कंत्राटे देण्यात आली. यात गब्बर झालेले कंत्राटदार लहान कंत्राटदारांची मुस्कटदाबी करतात. या सगळ्या प्रकाराच्या तक्रारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुणे, धुळे, जालना, लातूर, जळगाव आदी ठिकाणांहून करण्यात आल्या आहेत.संतोष सावजी यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता, त्यांच्या बंधुंनी सांगितले की, संतोष यांनी स्युसाईड नोटमध्ये लिहिलेल्या मजकुराची आणि त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. माझे बंधु संतोष हे काही दिवसांपासून दबावाखाली होते. त्यांना कोणत्या कंत्राटदारांचा त्रास होता, त्यांच्या कुटुंबाला संपविण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या का, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.वखार महामंडळात कोट्यवधी रुपयांचा वाहतूक दर घोटाळा झाल्याचे वृत्त लोकमतने २0 आणि २१ जानेवारीच्या अंकात दिले होते.