शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सत्र न्यायालयातील सुरक्षा यंत्रणेला जाग

By admin | Updated: July 20, 2016 05:54 IST

सत्र न्यायालयातील निद्रावस्थेत असलेल्या सुरक्षा यंत्रणेबाबत ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आल्यानंतर संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले

मुंबई : सत्र न्यायालयातील निद्रावस्थेत असलेल्या सुरक्षा यंत्रणेबाबत ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आल्यानंतर संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले आहे. न्यायालय परिसरात आढळलेल्या दारूच्या बाटल्यांची सफाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे उच्च न्यायालयाचे महानिबंधक मंगेश पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.कुलाबा येथील सत्र न्यायालयात अतिसंवेदनशील खटले चालतात. असे असतानाही येथील पहिल्या मजल्यावरील न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या आढळल्याचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला. याची खातरजमा केल्यानंतर, याबाबतच्या वास्तवाला मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आली. त्यानंतर, बाटल्या हटवण्यात आल्या. आज सकाळपासून सत्र न्यायालयातील सुरक्षा अधिक कडक केलेली पाहावयास मिळाली. या वेळी सामान्य नागरिकांबरोबरच वकिलांचीही सुरक्षा तपासणी करण्यात आली. वकिलांना ओळखपत्रांशिवाय आत सोडण्यात आले नाही. त्यामुळे वकील आणि पोलिसांमध्ये वादही झाला. सत्र न्यायालयाच्या आवाराची झाडाझडती घेण्यात आली. आणखी कुठे काही आहे का, याची पाहणी तेथील पोलिसांनी केली. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे उच्च न्यायालयाचे महानिबंधक मंगेश पाटील यांनी सांगितले. मात्र, या घटनेनंतरही परिमंडळ १ चे उपायुक्त मनोज शर्मा मात्र अजूनही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगून यावर बोलणे टाळले. सत्र न्यायालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्याचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला. याबातच्या वास्तवाला मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वाचा फोडण्यात आली होती.