शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वाकीत रसायनयुक्त दारू

By admin | Updated: July 13, 2017 01:19 IST

एकीकडे दारूबंदी झाली आणि दुसरीकडे हातभट्टी आणि गावठी दारूविक्रीला जोर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कवाकी बुद्रुक : एकीकडे दारूबंदी झाली आणि दुसरीकडे हातभट्टी आणि गावठी दारूविक्रीला जोर वाढला. वाकी आणि परिसरात असणाऱ्या याच अवैध दारूविक्रेत्यांविरोधात अनेक वेळा गावातील लोकांनी आंदोलने केली. प्रत्यक्ष छापे टाकले. परंतु स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांनी पाठिंबा न दिल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मध्यंतरीच्या काळात दारूबंदी झाल्यानंतर लोकांनी ‘ती नाही मिळाली तर गावठी प्या, पण दारू प्या’ हे एक मराठी गाणं प्रत्यक्ष कृतीत उतरवलं. दारूसाठी व्याकूळ झालेले लोक या दारूविक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात तुंबडी भरत आहेत. हे अवैध दारूविक्रेते दिवसाला जवळजवळ हजारो लिटर दारू वाकी खुर्द आणि वाकी बुद्रुक या दोन गावांच्या डोंगराळ परिसरात तयार करत असतात. अगदी मोठ्या प्रमाणात ही दारू तयार करून ठिकठिकाणी विक्री करत आहेत. आजही अनेक ठिकाणी अशा प्रकारची दारू विक्री परिसरात सुरू आहे. जर प्रत्येक गावात दारूबंदीविरुद्ध मतदान झाले तर मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झालेली कुटुंबे पुन्हा एकदा सुखी संसाराकडे वाटचाल करतील. गावच्या डोंगरावर रात्रीच्या सुमारास ही दारू तयार करून ती मोठ्या हौदात साठवली जाते. त्यामुळे दररोज ही हजारो लिटर तयार होणारी दारू बऱ्याच कुटुंबांना त्यांच्या कर्त्या पुरुषाच्या रूपाने त्यांच्या अंगात उतरून छळत असते. त्यामुळे अशा अवैध धंद्यांना आळा घालणे, हे खूप गरजेचे आहे. त्यासाठी सर्व गावकी, भावकी तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या विरोधात बंड पुकारून परिसरात सुरू असणारी ही दारूविक्री थांबवणे खूप गरजेचे आहे.