शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडील वीज थकबाकी माफ होणार

By admin | Updated: July 21, 2016 04:27 IST

विजबिलाची थकबाकी २० हजार कोटींची आहे, त्यापैकी शेतकऱ्यांकडे असलेली १३ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्याचा निर्णय योग्य वेळी घेणार

मुंबई : राज्यात विजबिलाची थकबाकी २० हजार कोटींची आहे, त्यापैकी शेतकऱ्यांकडे असलेली १३ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे आश्वासन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिले. महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांवर यावर्षी पाच टक्के वीज दरवाढ प्रस्तावित केली असून वीज नियामक आयोगाचा निर्णय आल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, तसेच ओपन अ‍ॅक्सेसमधून वीज घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे यापुढे अशा विजेवर वेगळा कर लावण्याचा निर्णय विभागातर्फे घेतला जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.राज्यात १९ टक्के वीज दरवाढ आकारुन ग्राहकांवर जादा बोझा टाकला जात असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि अन्य सदस्यांनी लक्षवेधी लावली होती. त्यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, राज्यात १९ टक्के दरवाढ ही एका वर्षात लावण्यात येणार नसून ती पाच वर्षासाठी मागण्यात आली आहे व अद्याप दरवाढ लागू झालेली नसून त्यावर आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. महावितरणकडे सध्या विजेच्या मागणीपेक्षा जास्त वीज असल्याने वीजनिर्मिती केंद्राचे बॅकडाऊन करावे लागत आहे. यात काही बॅकडाऊन हे ओपन अ‍ॅक्सेसमुळे करावे लागत आहेत. त्यामुळे यापुढे वीज निर्मिती केंद्रांना द्यावा लागणारा स्थिर आकार ओपन अ‍ॅक्सेसच्या ग्राहकांकडून वसूल करावा जेणेकरुन त्याचा भार महावितरणच्या अन्य ग्राहकांवर पडणार नाही. त्यासाठी ओपन अ‍ॅक्सेसवर अतिरिक्त कर लावण्याचा प्रस्तावही आयोगाकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>५६ हजार कोटींची दरवाढमहावितरणची उलाढाल ५८ हजार कोटींची आहे व प्रस्तावित दरवाढ ५६ हजार कोटींची आहे. याचा अर्थ दरवाढ अधिक होते, त्यामुळे स्वत:ची वीज निर्मिती बंद ठेवून खासगी वीज उत्पादकांकडून वीज खरेदी का केली जात आहे, असा सवाल वळसे पाटील यांनी केला. त्यावर कोणताही नवीन करार आपल्या सरकारने केला नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या विजबिलाची थकबाकी कधी रद्द करणार, असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला. त्यावर बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडे १३ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून त्यापैकी काही रक्कम उपसा सिंचन योजनांंची आहे. जैतापूरचा प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाला विनंती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.