शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोठड्या भरण्यासाठी कशाची वाट पाहाताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 04:52 IST

शरद पवार यांचा सवाल : चंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी

कोल्हापूर : कोठड्या भरण्यासाठी तुम्ही कशाची वाट पाहताय? भरा ना. आमची काही हरकत नाही. उलट तुरुंगातून जाऊन आल्यावर पुढची निवडणूक सोपी जाते. एकदा जनतेतून निवडणूक लढवा म्हणजे शिकायला मिळेल, असा टोमणा राष्टÑवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.मुंबई येथील भाजप मेळाव्यात बोलताना महसूल मंत्री पाटील यांनी छगन भुजबळ यांच्याशेजारी आणखी दोन-तीन कोठड्या शिल्लक आहेत, असा इशारा दिला होता. त्याला शरद पवार यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले.पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, ‘राजकारणात शत्रू नव्हे तर विरोधक असतो; परंतु विरोधकांना साप, विंचू, कुत्रे अशा उपमा देणारे लोक आता सत्तेत आहेत. हे संसदीय लोकशाहीला न शोभणारे आहे. त्यामुळे अशा लोकांच्या हातात सत्ता जास्त काळ ठेवणे योग्य नाही. दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी, असे आमचे प्रयत्न आहेत व त्याला काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही संमती दर्शविली आहे. त्यामुळे आम्ही शक्य तिथे एकत्र लढू.१० जूनला प्रचाराचा नारळ फोडणारराष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिन १० जूनला होत आहे. त्याचदिवशी निवडणुकीच्या प्रचाराचा आम्ही नारळ फोडणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.लोकच अद्दल घडवतील...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी हुकूमशहा म्हणणार नाही; परंतु माझा अनुभव असा आहे की, लोकशाहीची चौकट मोडून कुणी कारभार करीत असतील तर त्याला अद्दल घडविण्याची ताकद या देशातील सामान्य जनतेत आहे. श्रीमती इंदिरा गांधी यांनी जेव्हा देशात आणीबाणी लागू केली तेव्हा आम्हीही त्यांच्यासोबत होतो. हा निर्णय चांगला असल्याची त्यावेळी आमची भावना होती; परंतु जनतेला हा निर्णय आवडला नाही. त्यांनी इंदिरा गांधी यांचा पराभव करून राग व्यक्त केला.मुख्यमंत्र्यांनी धमकी देऊ नयेकोकणात जागा नाही दिली तर नाणार प्रकल्प गुजरातला जाईल, अशी धमकी मुख्यमंत्र्यांनी देऊ नये, असा सल्लाही पवार यांनी दिला. ते म्हणाले, ‘स्थानिक लोकांच्या संवेदना विचारात घेऊनच या प्रकल्पासंबंधी निर्णय व्हावा. हा प्रकल्प गुजरात किंवा कर्नाटकला गेला म्हणजे तो आपल्या देशातच आहे. गुजरातला गेला म्हणजे तो काय पाकिस्तानमध्ये गेला असे नव्हे, असाही टोला पवार यांनी लगावला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार