शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

हजारो वीज सहायक प्रतीक्षेत

By admin | Updated: November 17, 2015 03:00 IST

सेवानिवृत्ती, पदोन्नती आदी कारणांमुळे विद्युत कंपनीतील कामगारांच्या हजारो जागा रिक्त झाल्या आहेत. यानंतरही वर्षभरापासून विद्युत सहाय्यकांना प्रतीक्षा यादीवरच ठेवण्यात आले आहे.

- विलास गावंडे,  यवतमाळसेवानिवृत्ती, पदोन्नती आदी कारणांमुळे विद्युत कंपनीतील कामगारांच्या हजारो जागा रिक्त झाल्या आहेत. यानंतरही वर्षभरापासून विद्युत सहाय्यकांना प्रतीक्षा यादीवरच ठेवण्यात आले आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांकडे प्रत्येकी ५० ते ६० गावे असल्याने वीज विषयक प्रश्न गंभीर होत चालले आहे. तरीही नवीन कामगारांना घेण्यासाठी चालढकल सुरू आहे. लाईनमनला सहाय्यक म्हणून विद्युत सहाय्यक या पदासाठी काही महिन्यांपूर्वी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. यातील सुमारे सहा हजारावर लोकांना वेगवेगळ््या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. तीन हजार ५०० उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. या यादीची कालमर्यादा संपन्यापूर्वी नियुक्त्या मिळणे अपेक्षित आहे. मात्र अजूनतरी या यादीला हात लागला नसल्याचे सांगितले जाते. मेंटनन्स, जोडण्या, वसुली आदी प्रकारची कामे लाईनमनकडे आहे. एका कामगाराकडे अनेक गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही ठिकाणी तर ७० ते ८० ट्रान्सफार्मरची देखभाल दुरूस्ती त्यांना करावी लागत आहे. शिवाय बहुतांश कामगार वाढत्या वयामुळे विद्युत खांबावर चढूही शकत नाही. त्यामुळे नागरिकांचा प्रत्यक्ष संबंध येणारी कामे लांबणीवर पडत आहे. यावर उपाय म्हणून विद्युत कंपनीने काही महिन्यांपूर्वी विद्युत सहाय्यकांसाठी भरती प्रक्रिया घेतली. या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी वाट पाहावी लागत आहे.