मुंबई : नवी दिल्ली ते मुंबईदरम्यान वेगवान टाल्गो ट्रेन चालवण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्या या यशस्वी झाल्या. चार चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता पाचव्या चाचणीची प्रतीक्षा पश्चिम रेल्वेला आहे. ही चाचणीही नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रलदरम्यान ताशी १५0 किलोमीटरच्या वेगाने होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. आणखी एक चाचणी घेण्यासाठी रेल्वे बोर्डाकडूनच सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र या चाचणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. या ट्रेनची १ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेली पहिली चाचणी यशस्वी झाली होती. ३ आॅगस्ट रोजी दुसरी चाचणीही १४0 किलोमीटरच्या वेगाने घेण्यात आली आणि त्यातही पास झाली. यानंतर तिसरी चाचणी ९ आॅगस्टला घेण्यात आली. (प्रतिनिधी)
‘टाल्गो’ट्रेनच्या चाचणीची प्रतीक्षा!
By admin | Updated: September 5, 2016 05:06 IST