शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदार स्वाइप मशिनसाठी वेटिंगवर

By admin | Updated: January 3, 2017 06:23 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांवर भर दिला जात आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे खरेदी-विक्री करण्यास ग्राहक आणि दुकानदारांची पसंती मिळत आहेत

नम्रता फडणीस/प्रज्ञा केळकर-सिंग, पुणेनोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांवर भर दिला जात आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे खरेदी-विक्री करण्यास ग्राहक आणि दुकानदारांची पसंती मिळत आहेत. यामुळे कार्ड स्वाईप मशीनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खाजगी, राष्ट्रीयीकृत तसेच कोआॅपरेटिव्ह बँकांकडे अनेक व्यावसायिकांनी अर्ज केले असून अनेकांचे स्वाईप मशीन वेटिंगवर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. जुन्या नोटांनी व्यवहार करणे शक्य नसल्याने सर्व व्यवसायांवर विपरित परिणाम झाला. रोखीने व्यवहार करणे शक्य नसल्याने ग्राहकांची संख्या लक्षणीयरित्या घटली. काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने कॅशलेस व्यवहारांचे आवाहन करण्यात आले. पानटपरीपासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांनी कॅशलेस व्यवसायाची कास धरली. अनेकांनी स्वाईप मशीनसाठी बँकांकडे नव्याने अर्ज केले. मशीनची मागणी अचानक वाढल्याने अनेकांचे अर्ज प्रतीक्षेत असल्याचे बँकांकडून सांगण्यात आले. पूर्वी स्वाईप मशीनच्या वापरसाठी बँका व्यावसायिकांना माहिती देऊन उद्युक्त करत असत. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ग्राहक आपणहून बँकांकडे चौकशी करुन अर्ज करत आहेत. ग्राहकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास साधारणपणे १५-२० दिवसांमध्ये स्वाईप मशीन उपलब्ध होते. मात्र, मशीनची मागणी अचानक वाढल्याने हा कालावधी महिना-दीड महिन्यावर गेला आहे. मशीनची मागणी करणा-या ग्राहकांची संख्या दुुपटीने वाढली आहे.राष्ट्रीयीकृत बँका सेंट्रलाईज्ड कंपन्यांकडून स्वाईप मशीन घेतात. या मशीनचे उत्पादन परदेशात होऊन ती या कंपन्यांकडे येतात. तेथून मागणीप्रमाणे बँकांकडे मशीन पाठवली जातात. कोआॅपरेटिव्ह बँका एजन्सीना मशीनची आॅर्डर देतात. या एजन्सीकडे साधारण परिस्थितीत महिन्याला १०-१५ मशीनची मागणी होत असे. आता, ही संख्या १०० च्या घरात गेली आहे. त्यामुळे उत्पादक कंपन्यांवरील कामाचा भारही वाढला आहे. त्यामुळेच सर्व पातळयांवर तुटवडा निर्माण झाला असून दुकानदारांचे स्वाईप मशीनचे अर्ज प्रतीक्षेत असल्याचे निष्पन्न झाले. स्वाईप मशीनबाबतचे अर्ज, कामाचा भार वाढला असला तरी व्यावसायिकांचा कॅशलेस व्यवहारांकडे कल वाढणे, ही समाधानाची बाब असल्याचे बँकेच्या वरिष्ठ पदाधिका-यांनी सांगितले. अनेक बँकांनी व्यवहार सुलभ करण्यासाठी स्वत:ची अ‍ॅप्लिकेशन आणि कोड सिस्टिम विकसित केली आहे. या माध्यामातून ग्राहक आणि दुकानदारांना कमी वेळेत व्यवहार करणे सोपे झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.