शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

संत तुकाराम गाथा अनुदानाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: March 7, 2015 12:04 IST

गाथारूपाने ‘शब्दधन जनलोका’ देऊन मराठी वाङ्मय समृद्ध करणाऱ्या संत तुकाराम गाथेला शासकीय अनुदानाची प्रतीक्षा आहे.

विश्वास मोरे, पिंपरीगाथारूपाने ‘शब्दधन जनलोका’ देऊन मराठी वाङ्मय समृद्ध करणाऱ्या संत तुकाराम गाथेला शासकीय अनुदानाची प्रतीक्षा आहे. अनुदान बंद झाल्याने आता गाथेची किंमत दुपटीने वाढली आहे. चौदा वर्षांत एक लाख पस्तीस हजार विक्री करून अक्षरवाङ्मयात गाथेने विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘आम्हा घरी धन, शब्दांची रत्ने...’ असे अक्षरांचे महत्त्व सांगून अभंगातून माणसांचे जीवन समृद्ध करणाऱ्या, भागवत धर्माच्या वारकरी संप्रदायाचा कळस, अर्थात संत तुकाराम महाराज यांच्या गाथेला दिवसेंदिवस अधिकच लोकप्रियता मिळत आहे. गाथेचा प्रवास पाहता, आजवर बाबासाहेब आजरेकर, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष स. के. नेऊरगावकर, बॅरिस्टर बा. ग. परांजपे, शंकर पंडित, लक्ष्मणराव पांगारकर, पुरुषोत्तम लाड, संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा, वारकरी समाज संस्था यांनी तुकाराम गाथा संपादित केली होती. काहींनी धार्मिक अंगाने, तर काहींनी वैचारिक अंगाने सार्थ गाथा (पारायण प्रत) निर्माण केली आहे. साहित्य अकादमीसाठी डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी संक्षिप्त अभंगगाथा साकारली होती. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील अनेक संस्था, कीर्तनकारांनी गाथा प्रकाशित करून अक्षरधनात भर टाकली आहे. विठ्ठलभक्तीबरोबरच जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या, आत्मभान जागृत करण्याचे अलौकिक कार्य गाथेने केले आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनता डोळ्यांसमोर ठेवून ‘तुकाराम गाथा’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी श्रीक्षेत्र देहूतील संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेतला. तुकोबारांयाचे वंशज व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी तुकोबारायांच्या हस्तलिखितांचा, वह्यांचा आधार घेऊन संशोधन करून अधिकृत गाथा प्रकाशित केली. तसेच, पहिल्यांदा तुकाराम डॉट कॉमच्या माध्यमातून दिलीप धोंडे यांनी ही गाथा आॅनलाईन उपलब्ध करून दिली होती. पहिल्या टप्प्यातील अनुदान संपल्यानंतर २००९मध्ये शासनाने- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने पंधरा लाखांचे अनुदान दिले. त्यानंतर ७० हजार गाथांची निर्मिती केली. गाथेची किंमत झाली दुप्पट> सुंदर मुखपृष्ठ, उत्तम कागद, उत्कृष्ट बांधणी या गाथेचे वैशिष्ट्य असून, देवस्थानाने या गाथेस अधिकृत मान्यता दिली आहे. २००८पूर्वी या गाथेच्या एका प्रतीसाठी ८६ रुपये खर्च येत होता. त्या वेळी अनुदान असल्याने ही गाथा पन्नास रुपयांना विकली जात होती. मार्च २०१४पासून एका प्रतीसाठी ११० रुपये खर्च येत आहे. शिवाय, शासकीय अनुदानही संपले आहे. असे असताना केवळ ही गाथा शंभर रुपयांना विकली जात आहे. निर्मिती मूल्यापैकी दहा रुपयांचा भार देवस्थान उचलत आहे. तरच किंमत कमी होऊ शकेल> तुकाराम गाथा जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाचे अनुदान मिळणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना सरकारने गाथेला अनुदान द्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही अनुदानाबाबत सकारात्मकता दर्शविलेली आहे. शासनाकडून अनुदान मिळाले, तर वारकऱ्यांना पुन्हा पन्नास रुपयांना गाथा देणे शक्य होईल, असे मत संत तुकाराम देवस्थानाचे अध्यक्ष रामदास मोरे यांनी व्यक्त केले.