शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...आता प्रतीक्षा कुलभूषण यांच्या सुटकेची!

By admin | Updated: May 19, 2017 03:30 IST

हेरगिरीच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. या निर्णयानंतर

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हेरगिरीच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. या निर्णयानंतर मुंबईकरांसह जाधव यांच्या मित्रपरिवाराने मिठाई वाटत आनंद साजरा केला. आता जाधव यांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणीही पुढे आली आहे.जाधव यांचे बालपण गेलेल्या डिलाइल रोड येथील पोलीस वसाहतीसमोरच त्यांचा मोठा परिवार राहतो. जाधव यांची निर्दोष मुक्तता व्हावी, म्हणून येथील पृथ्वीवंदन सोसायटीमधील मित्र परिवाराने इतर रहिवाशांसोबत सकाळपासून पूजा-अर्चा सुरू केली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दुपारी जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आणि रहिवाशांनी जल्लोष केला. जाधव यांचे मित्र तुळशीदास पवार म्हणाले की, ‘जाधव यांच्यासोबत लहानपणापासून एकत्र वाढल्याने घट्ट मैत्री आहे. त्यांचे वडील निवृत्त झाल्यानंतर ते पवईला स्थलांतरीत झाले. मात्र, जिव्हाळा तसूभरही कमी झाला नाही. घराबाहेर फटाक्यांची आतशबाजीकुलभूषण जाधव हे कुटुंबासोबत पवईच्या हिरानंदानी परिसरात राहतात. निर्णयानंतर स्थानिक रहिवासी आणि राजकीय नेत्यांकडून बंद घराबाहेर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना पेढे वाटून लोकांनी आनंद साजरा केला. आमच्यासाठी आज दिवाळी!आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आज खूपच आनंद झाल्याची प्रतिक्रिया डिलाईल रोड येथील रहिवाशांनी व्यक्त केली. फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई वाटण्यात आली. संपूर्ण देशातून त्यांच्यासाठी प्रार्थना सुरू होती. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळीहून कमी नाही. डबेवाल्यांचेही साकडेजाधव यांच्या अटकेनंतर मुंबईत ठिकठिकाणी मुंबईच्या डबेवाल्यांनी आंदोलने केली. जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर डबेवाल्यांनी निदर्शनेही केली होती. न्यायालयाने फाशीला स्थगिती दिल्यानंतर डबेवाल्यांनी आनंद व्यक्त करत, केंद्र सरकारने जाधव यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी साकडे घातले आहे.