शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनची प्रतीक्षाच!

By admin | Updated: June 14, 2016 03:04 IST

राज्यात मान्सून येण्यास अजूनही अनुकुल स्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना अजून थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पुणे : राज्यात मान्सून येण्यास अजूनही अनुकुल स्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना अजून थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. मान्सून ११ जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज अगोदर भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला होता. मात्र अनुकुल परिस्थिती निर्माण न झाल्याने अजून दोन-तीन दिवस तरी प्रतिक्षाच करावी लागणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, राज्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी चांगला मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत रत्नागिरीमध्ये सर्वाधिक १०१ मिमी पाऊस झाला. गेल्या २४ तासात विदर्भातील भिवापूर येथे ५० मिमी, मराठवाड्यातील बिलोली, परांडा येथे पत्येकी ५० मिमी पाऊस पडला. त्यापाठोपाठ म्हापसा, सांगे,तीतोरा येथे ४०, देवगड, मालवण, राजापूर, ब्रम्हपूरी, ईटापल्ली, लाखांदूर, मूलचेरा येथे ३०, भिरा, गुहाघर, कणकवली, कुडाळ, मुरूड, रोहा, सावंतवाडी, पाली, वैभववाडी, वेंगुर्ला, माढा, मोहोळ, पंढरपूर, भूम, अहिरी, आरमोरी, बल्लारपूर, तुमसर येथे २०, हर्णे, श्रीवर्धन, जेऊर, महाबळेश्वर, अंबेजोगाई, पाटोदा, शिंदेवाही येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.पाऊस येण्यास उशीर होत असल्याने विदर्भ, खान्देशामधील तापमान अजूनही चढेच आहे. आज राज्यात सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सिअस तापमान उपराजधानी नागपूर येथे नोंदविले गेले. त्याव्यतिरिक्त जळगाव, अमरावती, ब्रम्हपूरी, चंद्रपूर, गोंदिया आणि वर्धा येथील तापमान ४० अंशाच्या वर होते. (प्रतिनिधी)मॉन्सून कारवारमध्येच...अंदमानसह पश्चिम बंगालच्या उपसागरात वेगाने दाखल झालेला मॉन्सून केरळ, तामिळनाडू ओलांडल्यानंतर अद्यापही कारवारमध्येच रेंगाळला आहे. मॉन्सून पुढे सरकरण्यासाठी येथील परिस्थिती अनुकूल असली तरी येत्या ४८ तासांत त्याचा प्रवास मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागांत, ईशान्यकडील काही राज्ये, उप-हिमालयाचा पश्चिम बंगाल भाग आणि सिक्कीमच्या काही भागांकडे होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.परिणामी मान्सूनच्या महाराष्ट्र आगमनाबाबत अद्यापही अनिश्चितता असल्याने राज्याला पावसाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मुंबईसह राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळत असल्या तरी राज्याला मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. मागील २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. तर कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात वाढ झाली.मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मुंबईचा विचार करता येथेही मॉन्सूनपूर्व सरींनी विश्रांती घेतली असून, उकाड्यातील वाढ कायम आहे. परिणामी मुंबईकर ऊकाड्याने हैराण असून, येत्या ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.