शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जीआरपीला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा

By admin | Updated: June 5, 2017 05:11 IST

शहरातील रेल्वे मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे

महेश चेमटे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरातील रेल्वे मार्गावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांकडे आहे. मात्र, रेल्वे पोलिसांचे सद्यस्थितीचे मनुष्यबळ पाहता, रेल्वे पोलीस (जीआरपी) दलाला ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे. अनेक वर्षांपासून पदांच्या निर्मितीसह कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे प्रवासी सुरक्षा तुटपुंज्या रेल्वे पोलिसांवर असल्याचे दिसून येत आहे.शहरात सर्वात जास्त प्रवास लोकलने केला जातो. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलीस (जीआरपी) तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे हद्दीतील गुन्हा उघडकीस आणणे, गन्हेगारांचा शोध घेणे, अपघातातील मृत व्यक्तींचा पंचनामा करणे, अशी मुख्य जबाबदारी रेल्वे पोलिसांवर असते. मात्र, रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. १९८१ ते २०१४ या कालावधीत केवळ २३९ पोलीस अधिकारी आणि ३,७८० पोलीस कर्मचारी भरती झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. २००० साली ८७ अधिकारी व ७२३ कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. २०१४ साली रेल्वे पोलीस दलात १०० पोलिसांची भरती झाली होती. मात्र त्यानंतर, अद्यापपर्यंत रेल्वे पोलीस ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.रेल्वेच्या ३ हजार लोकल फेऱ्यांमधून दररोज ७७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवासी सुरक्षेसह कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान काही हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी करत आहे. सीएसटी ते कर्जत, कसारा आणि चर्चगेट ते बोर्डी रोड रेल्वे स्थानकांपर्यंतचा परिसर रेल्वे पोलिसांच्या कक्षेत येतो. परिणामी, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जीआरपीला अधिकारी पदांसह ‘मेगा’ भरतीची प्रतीक्षा आहे.