शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी निकालासाठी अद्याप प्रतीक्षाच !

By admin | Updated: February 27, 2016 02:12 IST

तळगाळातील पक्षकारांनासुद्धा आपल्या संदर्भातील निकाल अधिक चांगल्या रितीने समजावा यासाठी न्यायालयाने त्यांचे निकाल मराठी द्यावे असे आदेश असूनही प्रत्यक्षात बहुतांश

पुणे : तळगाळातील पक्षकारांनासुद्धा आपल्या संदर्भातील निकाल अधिक चांगल्या रितीने समजावा यासाठी न्यायालयाने त्यांचे निकाल मराठी द्यावे असे आदेश असूनही प्रत्यक्षात बहुतांश न्यायाधीश अजूनही इंग्रजीतच निकाल देतात असे चित्र आहे. त्यामुळे मराठी निकालासाठी अद्यापही पक्षकार प्रतिक्षेत आहेत.‘शहाण्याने न्यायालयाची पायरी चढू नये’ या उक्तीसहच सामान्य माणूस न्यायालयापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र काहीतरी प्रसंग ओढावल्याने वा घटना घडल्यानंतर सामान्यांनाही न्यायालयात जावेच लागते. त्यातच न्यायालयीन कामकाज मुळातच सर्वसामान्य व्यक्तींना कळण्यास अवघड असतात. त्यामुळे पक्षकारांना न्यायालयीन कामकाजाविषयी प्रत्येकवेळी वकिलांवर अवलंबून रहावे लागते. वकिलांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्यांना आपल्या खटल्याची माहिती घ्यावी लागते. ही सगळी अडचण लक्षात घेऊन, तसेच स्थानिक भाषेत निकालामुळे प्रलंबित खटल्यांचे प्रमाणही वाढेल या अपेक्षेने उच्च न्यायालय व राज्य शासनाने वेळोवेळी परिपत्रक काढून, न्यायाधीशांनी निकाल मराठीत द्यावे असे सांगण्यात आले आहे. मराठीतून निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो. मात्र अद्यापही बहुतांश न्यायाधीश हे इंग्रजीतूनच निकाल देतात. पक्षकारांना उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी यासाठी इंग्रजीतून निकाल देत असल्याची पळवाट काढली जाते. न्यायालयीन कामकजात पुरावा, जबाब, इतर कागदपत्रांपासून ते आरोपपत्रापर्यंत बहुतांश गोष्टी या मराठीतूनच घेतल्या जातात. मात्र न्यायाधीश निकाल इंग्रजीतच देतात. पक्षकारांवर याचा परिणाम होतो. हे टाळण्यासाठी न्यायाधीशांनी निकाल मराठीतून द्यावे अशी अपेक्षा पक्षकारांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)मराठीत निकाल देणाऱ्या न्यायाधीशांसाठी काही प्रमाणात प्रोत्साहन भत्ताही ठेवण्यात आला आहे. न्यायाधीशांनी ही बाब उचलून धरलेली दिसत नाही. मुळात इंग्रजी आणि मराठी असे दोनदा रेकॉर्डिंग करण्याची पद्धतच बंद करायला हवी. केवळ मराठीतूनच रेकॉर्डिंग व्हावे यामुळे त्यात गुंतलेला कर्मचारी वर्ग इतर कामाकडे वळेल. चीन, फ्रान्स, इटली अशा देशांतही त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये निकाल दिला जातो तर आपल्याकडे देण्यास काय अडचण आहे? शिवाय उच्च न्यायालयात जाण्याचे प्रमाण अगदीच थोडे आहे, त्यामुळे प्रथमवर्ग दंडाधिकारी व सत्र न्यायाधीशांनी मराठीतून निकाल देणे जास्त महत्त्वाचे आहे.- अ‍ॅड. एस.के. जैन, ज्येष्ठ विधिज्ञउच्च न्यायालय व महाराष्ट्र सरकारने न्यायाधीशांनी निकाल मराठीत द्यावे असे सांगितले आहे. मात्र, अद्यापही न्यायाधीशांची याबाबत अनास्था आहे. संगणकावर इंग्रजीच टायपींग आहे अशी सबब दिली जाते. उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी इंग्रजीतून निकाल दिला जातो असे ही कारण पुढे केले जाते मात्र प्रत्यक्षात ज्या पक्षकाराला दाद मागायची असेल तो त्याचे भाषांतर करून घेईल त्यासाठी न्यायाधीशांनी इंग्रजीत निकाल देण्याची आवश्यकता नसते. - अ‍ॅड. सुरेशचंद्र भोसले, ज्येष्ठ विधिज्ञ