शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सीएसटीला ‘महाराजां’ची प्रतीक्षा

By admin | Updated: March 2, 2017 05:42 IST

छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावांमध्ये ‘महाराज’ हा शब्द समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २0१६च्या डिसेंबर महिन्यात घेतला.

मुंबई : रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावांमध्ये ‘महाराज’ हा शब्द समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २0१६च्या डिसेंबर महिन्यात घेतला. मात्र, दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही सीएसटीला अजूनही ‘महाराजां’ची प्रतीक्षाच आहे. राज्य सरकार आणि रेल्वेकडून याबाबत उदासीनता दाखविली जात असून, राज्यात, तसेच केंद्रात भाजपा सरकार असूनही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच करण्यात आले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी घातलेला निर्णय हा प्रत्यक्षात का अंमलात आला नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मध्य रेल्वेवरील सीएसटी म्हणजेच छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या नावात ‘महाराज’ हा आदरार्थी असा शब्द नसल्याने, तो समाविष्ट करावा, असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर आला आणि त्याला मंजुरीही २0१६ च्या डिसेंबर महिन्यात देण्यात आली. या निर्णयानंतर मध्य रेल्वेच्या सर्व यंत्रणेतच बदल करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात १४0 लोकल आहेत. या लोकलच्या समोरच्या दिशेने असणाऱ्या सीएसटी या नावात बदल करावे लागतील. या बदलाबरोबरच सर्वात मोठे बदल सीएसटीहून सुटणाऱ्या तब्बल ५0 मेल-एक्स्प्रेस व पॅसेंजर ट्रेनमध्ये करावी लागणार आहेत. याबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतल्यानंतर, या कामाला वेग आलेला नाही. मध्य रेल्वेलाही रेल्वे बोर्डाकडून कोणतेही निर्देश आले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अद्याप सीएसटी नावात बदल करण्यात आले नसल्याची माहिती दिली.(प्रतिनिधी)>एलफिन्स्टनचाही विसरमध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात ‘महाराज’ हा आदरार्थी शब्द समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, काही दिवसांनी एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. एलफिन्स्टनचे नाव बदलून ते प्रभादेवी करतानाच तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी माहिती त्या वेळी देण्यात आली. परंतु त्याचा विसरही शासनाला पडला.